पुणे- येथली राजगुरुनगरमध्ये 31 वर्षीय तरूणाने वाढदिवसाच्या दिवशीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून सागर टकले असे मृत युवकाचे नाव आहे.
हेही वाचा- यवतमाळ : घरघुती वादातून नातवाने केला आजीचा खून
राजगुरुनगर येथील आझाद चौक येथे राहणाऱ्या सागर टकले या तरूणाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली. मात्र, सागरने आत्महत्या का केली? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सागरच्या आत्महत्येने राजगुरुनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात यशस्वी जीवन जगत असताना आत्महत्या सारखे पाऊल तरुणाईतील मुलांनी उचलणे ही धक्कादायक बाब आहे. समाजात वेगवेगळ्या माध्यमातून जीवनशैली कशी असावी यावर अनेक मार्गदर्शन शिबिरे होतात. मात्र, सध्याची तरुणाई त्यातूनही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते ही गंभीर बाब आहे.