पुणे- मकर संक्रांती निमित्ताने तीळ आणि गुळाच्या माध्यमातून विविध पदार्थ बनवले जातात, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या यासोबतच तिळाच्या पोळ्या हा देखील खास पदार्थ मकर संक्रांती निमित्ताने घराघरात केला जात असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोठ्या शहरांमध्ये महिलांना तातडीने अशा प्रकारचे पदार्थ बनवता येत नाहीत त्यासाठी त्यांना पाककृतीचा आधार घ्यावा लागतो.
हीच बाब ओळखून ईटीव्ही भारतने मकर संक्रांतीनिमित्त तीळ आणि गुळाच्या विविध पाककृती आपल्या प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. मकर संक्रांती निमित्ताने तिळ गुळाची पोळी म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. शुद्ध तुपात खरपूस भाजलेली तीळ गुळाची पोळी हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या तोंडात पाणी येतं. तेव्हा चला तर मग आज आपण पाहूया पुण्यातील गृहिणी ऋचा रानडे यांनी खास ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी दाखवलेली पाककृती तिळगुळाची पोळी.