ETV Bharat / state

Mahila Samman Yojana: महिला सन्मानने एसटी महामंडळाच्या तिजोरीमध्ये भार नव्हे भर; तीन दिवसांत मिळाले 'इतके' उत्पन्न

एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेचा महिलांसह महामंडळालाही फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत 50 टक्के तिकिटाची सवलत देण्यात आली. 17 तारखेपासून योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली. महिला प्रवाशांनी या योजनेचा चांगला फायदा घेतलेला आहे. या योजनेमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडत आहे.

author img

By

Published : Mar 21, 2023, 7:36 AM IST

Mahila Samman Yojana
महिला सन्मान योजनेचा महिलांसह महामंडळालाही फायदा
प्रतिक्रिया देताना भूषण सूर्यवंशी व्यवस्थापक स्वारगेट डेपो

पुणे : राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर केला गेला. हा राज्यात शिंदे फडवणीस सरकार आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प होता. यात अनेक योजनांच्या घोषणा केल्या गेल्या. काही योजना या महिलांंसदर्भात होत्या. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांना 50 टक्के तिकिटाची सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेमुळे काही ठिकाणी महामंडळ तोट्यात जाईल, अशी चर्चा होती. ज्या, ज्या वेळी सरकार अशा योजना राबवते, त्यावेळी सरकारच्या तिजोरीवर भार पडलेला असतो. परंतु प्रथमच या योजनेकडून महामंडळाच्या तिजोरीमध्ये भार न पडता भर पडल्याचे दिसत आहे.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात महिलांना प्रवासात 50 टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना 17 तारखेपासून सुरू झाली. महिला मोठ्या प्रमाणावर या योजनेचा फायदा घेत आहेत. या योजनेमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाला राज्य सरकारतर्फे देणाऱ्या भत्त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आर्थिक संकटातून एसटी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी ही मदत खूप उपयोगाची आहे. महिला सन्मान योजनेमुळे तीन दिवसाच्या आकडेवारीवरून एसटी महामंडळाला तब्बल 2 कोटी 84 लाख रूपयांचा राज्यभरातून फायदा मिळालेला दिसत आहे.

एकूण महिलांचा प्रतिसाद : स्वारगेट स्थानकातून 17 मार्च रोजी या योजनेअंतर्गत 541 महिलेने प्रवास केला. 18 मार्चला 22,85 महिलांनी प्रवास केला आहे. 19 मार्चला 2485 महिलाने या योजनेचा फायदा घेतला आहे. महिलांचाही मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. 18 मार्च रोजी राज्यभरात 11, 30, 283 महिलांनी या योजनेअंतर्गत प्रवास केला. एसटी महामंडळाला 2 कोटी 84 लाख रुपये एवढे उत्पन्न महाराष्ट्रातून मिळाले आहे. त्यामुळे महिला सन्मान योजनेतून महिलांचा फायदा झाला आहे, परंतु यात महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसत आहे. या योजनेचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक महिला आता महामंडळाच्या बसमधून प्रवास करून त्याचा फायदा घेत आहेत, अशी माहिती स्वारगेट डेपोचे व्यवस्थापक भूषण सुर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा : Central Railway Revenue: ऐका हो ऐका, मध्य रेल्वेला आले 'अच्छे दिन'; रेल्वेचा महसूल वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.