ETV Bharat / state

Pimpri Chinchwad By Election : पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार

पिंपरी चिंचवड, पुण्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या काँग्रेसकडून ६ उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे उद्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत या जागांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Chinchwad Assembly By Election
Chinchwad Assembly By Election
author img

By

Published : Feb 2, 2023, 10:25 PM IST

मुंबई : विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या संदर्भात प्रदेश काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आ. संग्राम थोपटे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, एनएसयुआयचे आमिर शेख आदी उपस्थित होते.

एकत्र लढवणार : दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे ६ इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील, त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

तांबे यांना जनतेने धडा शिकवला : नाशिक पदवीधर मतदारसंघाबद्दल काँग्रेस पक्षाचे धोरण, निर्णय चुकलेले नाही, योग्य व सविस्तर चर्चा करुनच नाशिकचा निर्णय घेतलेला होता. पक्षाला बदनाम करण्याचे काम कोणी करत असेल तर त्याला उत्तर देऊ. डॉ. सुधीर तांबे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्याप्रमाणे निर्णय घेतला होता पण डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्याक्षणी काँग्रेस पक्षाशी विश्वासघात केला. भाजपाने दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचे काम केले. त्याला जनतेने धडा शिकवला आहे, असे पटोले म्हणाले.

हेही वाचा - Hasan Mushrif On ED action : आजपर्यंत बँकेवर डाग नाही; ईडी कारवाईमुळे त्यांचा हेतू दिसून येत आहे : हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.