ETV Bharat / state

महाशिवरात्री स्पेशल: पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध ऐतिहासिक "येलेश्वर" मंदिर - इंद्रायणी नदी

या शिवलिंगावर पेंटिंग केल्याप्रमाणे भस्म, कपाळावर तिसरा डोळा, आणि मागे केसांच्या जटा आहेत.

येलेश्वर मंदिरातील स्वयंभू शिवलिंग
author img

By

Published : Mar 4, 2019, 9:06 AM IST

पुणे - आज महाशिवरात्री असल्यामुळे अनेकजण विविध शिव मंदिरात जात असतात. महाराष्ट्रात अनेक शिवमंदिरे प्रसिद्ध आहेत. यापैकी काही शिव मंदिरांना ५०० ते ६०० वर्षे जुना इतिहास आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील देहू मधील येलेश्वर या शिवमंदिराचादेखील समावेश आहे.

संत तुकाराम महाराजांचा वारसा लाभलेले देहू हे गाव. गावाशेजारीच असलेल्या येलवाडी गावात ५०० ते ६०० वर्ष जुने स्वयंभू शिवलिंग आहे. हे शिवमंदिर येलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या येलेश्वराच्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की, या शिवलिंगावर पेंटिंग केल्याप्रमाणे भस्म, कपाळावर तिसरा डोळा, आणि मागे केसांच्या जटा आहेत. याबाबत गावातील लोक इतिहास सांगतात की, ज्यावेळी मुघल सत्तेत असताना हिंदूंची विविध मंदिरे पाडत होते. त्यामध्ये येलवाडीतील येलेश्वराचाही समावेश होता.

संबंधित व्हिडीओ

मुघलांनी मंदिर पाडल्यानंतर गावातील लोकांनी शिवलिंग उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवले. हे मंदिर पाडण्यात आले, त्यावेळी शिवलिंगासमोर असलेल्या नंदीच्या चेहऱ्याचा काही भाग तुटला. काही काळानंतर याच शिवलिंगाची स्थापना गावकऱ्यांनी केली. इंद्रायणी नदीच्या किनारी मंदिर बांधून त्यामध्ये स्वयंभू शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. मात्र, पूर्वी ज्याठिकाणी हे स्वयंभू मंदिर होते, तिथे तो दगडी नंदी अजूनही आहे. नवीन मंदिरात हा नंदी ठेवण्यासाठी गावकऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले गेले, मात्र, हा नंदी उचलला जात नाही.

या मंदिराची आणखी एक आख्यायिका आहे. संत तुकाराम महाराजांनी आपली कन्या भागीरथी माता यांचा विवाह देहू शेजारील येलवाडी या ठिकाणी रहिवासी असलेल्या गाडे कुटुंबात करून दिला. त्यानंतर संत तुकाराम महाराज हे आपल्या मुलीला न सांगता वैकुंठी निघून गेले. भागीरथी मातेला ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी देवाचा धावा केला. त्यानंतर काही वेळासाठी संत तुकाराम महाराज हे वैकुंठातून पुन्हा आपल्या मुलीला भेटण्यासाठी येलवाडी याठिकाणी आले. वडील आलेले पाहून भागीरथी मातेने शेवयांची खीर बनवली. मात्र, या खिरीत घालण्यासाठी दूध नव्हते. गावात कुठेही दूध मिळाले नाही, त्यावेळी भागीरथी माता याच येलेश्वराच्या मंदिरात गेल्या. त्याठिकाणी त्यांना दृष्टांत झाला. भागीरथी मातेने येलेश्वराच्या समोर असलेल्या दगडी नंदीमधून दूध काढले आणि संत तुकाराम महाराजांना खीर खायला दिली. आजही या पुरातन असलेल्या येलेश्वराच्या दगडी नंदीवर भागीरथी मातेच्या बोटांचे ठसे आहेत.

undefined

असा प्राचीन इतिहास आणि आख्यायिका या शिवलिंगाला आणि नंदीला आहे. नुकतीच पुरातत्व खात्याकडूनही या शिवलिंगाची तसेच नंदीची पाहणी करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येलवाडी गावात येलेश्वराचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून अनेक भाविक भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात गर्दी करतात.

Intro:

SPECIAL STORY

File name - MH_Pimprichinchwad_YELESHWAR_SpecialStory_ChaitraliR
total files - 10
byte -03
1) yeleshwar trust adhyaksh
2) bhaguji gade, gawkari
3) D Gade, Gawkari
आज महाशिवरात्री.. आणि त्यानिमित्ताने अनेकजण विविध शिव मंदिरात जात असतात. महाराष्ट्रात तर अनेक अशी शिवमंदिरे प्रसिद्ध आहेत.. मात्र काही शिव मंदिरे यांना 500 ते 600 वर्ष जुना असा इतिहास आहे. यात पिंपरी चिंचवड शहरातील देहू मधील येलेश्वर या शिवमंदिराचा देखील समावेश आहे. Body:जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वारसा लाभलेले देहू हे गाव.. देहू गावशेजारीच असलेल्या येलवाडी गावात 500 ते 600 वर्ष जुने स्वयंभू शिवलिंग आहे. हे शिवमंदिर येलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या येलेश्वराच्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की, या शिवलिंगावर पेंटिंग केल्याप्रमाणे भस्म, कपाळावर तिसरा डोळा, आणि मागे केसांच्या जटा आहेत. याबाबत गावातील लोक इतिहास सांगतात की, ज्यावेळी मुघल राज्य होत त्यावेळी मुघल हे हिंदूंची विविध मंदिरे पाडत होते. त्यातच मुघलांनी एक मंदिर पाडले त्यात या येलवाडीतील येलेश्वराचा देखील समावेश होता. मुघलांनी मंदिर पाडल्यानंतर गावातील लोकांनी शिवलिंग उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवले. मात्र मुघलांनी जेंव्हा हे मंदिर पाडले त्यावेळी शिवलिंगासमोर असलेल्या नंदीच्या चेहऱ्याचा काही भाग तुटला गेला. काही काळानंतर ह्या शिवलिंगाची स्थापना गावकऱ्यांनी केली. इंद्रायणी नदीच्या किनारी मंदिर बांधून ह्या मंदिरात स्वयंभू शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. मात्र पूर्वी ज्याठिकाणी हे स्वयंभू मंदिर होते त्या ठिकाणी आद्यपही त्याकाळी असलेला दगडी नंदी आहे. नवीन मंदिरात या नंदी ठेवण्यासाठी गावकऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात मात्र कितीही बळ वापरले तरी हा नंदी उचलला जात नाही.

या मंदिराची आणखी एक आख्यायिका आहे. ती म्हणजे संत तुकाराम महाराजांनी आपली कन्या भागीरथी माता यांचा विवाह देहू शेजारील येलवाडी या ठिकाणी रहिवासी असलेल्या गाडे कुटुंबात करून दिला. त्यानंतर संततुकाराम महाराज हे आपल्या मुलीला न सांगता वैकुंठी निघून गेले. ज्यावेळी त्यांची कन्या भागीरथी मातेला ही गोष्ट समजली त्यावेळी तिने देवाचा धावा केला. त्यानंतर काही वेळासाठी संत तुकाराम महाराज हे वैकुंठातून पुन्हा आपल्या मुलीला भेटण्यासाठी येलवाडी याठिकाणी आले. वडील आलेले पाहून भागीरथी मातेने शेवयांंची खीर बनवली. मात्र या खिरीत टाकण्यासाठी दूध नव्हते. संपूर्ण गावात भागीरथी माता दुधासाठी फिरली. मात्र दूध मिळाले नाही. त्यावेळी भागीरथी माता ही याच येलेश्वराच्या मंदिरात गेली. त्याठिकाणी तिला दृष्टांत झाला. आणि भागीरथी मातेने येलेश्वराच्या समोर असलेल्या दगडी नंदी मधून दूध काढले. आणि आपल्या वडिलांना अर्थातच संत तुकाराम महाराजांना खीर खायला दिली. आजही या पुरातन असलेल्या येलेश्वराच्या दगडी नंदीवर भागीरथी मातेच्या बोटांचे ठसे आहेत.

Conclusion:प्राचीन असा इतिहास हा या शिवलिंगाला आणि शिवलिंगासमोर असलेल्या नंदीला आहे. नुकतीच पुरातत्व खात्याकडून देखील या शिवलिंगाची तसेच नंदीची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा दिवस येलवाडी या गावात येलेश्वराचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून अनेक भाविक भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात गर्दी करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.