ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : अजित पवारांच्या भूमिकेनंतर शरद पवार यांना राहुल गांधींसह देशातील विविध नेत्यांचे फोन - Sharad Pawar Received Calls

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 40 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. जवळपास 40 आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. (Uddhav Thackeray call to Sharad Pawar ) नऊ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. (Ajit Pawar rebellion) अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी पवार म्हणाले. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्री तसेच नेते मंडळी यांचे फोन आले असून त्यांनी देखील शरद पवार यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे.

Sharad Pawar Received Calls
शरद पवारांना विविध नेत्यांचे फोन कॉल्स
author img

By

Published : Jul 2, 2023, 11:01 PM IST

पुणे : याबाबत स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, (Uddhav Thackeray call to Sharad Pawar) अजित पवार यांच्या भूमिकेनंतर काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील विविध नेत्यांचे फोन आले. त्यांनी याबाबत माहिती घेतली आणि मी याबाबत त्यांना माहिती दिली असल्याचे यावेळी शरद पवारांनी सांगितले. (Ajit Pawar rebellion)

तीन शब्दांत खोचक प्रतिक्रिया: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या धक्काने राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या तीन शब्दांत खोचक प्रतिक्रिया दिली. नांदा सौख्य भरे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी देखील स्वार्थ आणि स्वाभिमान अशी लढाई होणार असल्याचे सूचक विधान केले. तसेच शिंदे गट आणि भाजपला थेट आव्हान दिले.

तिसरा सर्वांत मोठा भूकंप: शिंदे सरकारला 30 जूनला वर्ष पूर्ण झाले. सरकारची वर्षपूर्ती होताच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावा भाजप-शिंदे गटाकडून करण्यात येत होता. मंत्री पदासाठी शिंदे गटातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, अचानक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आठ आमदारांना सोबत घेऊन मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणातला हा तिसरा सर्वांत मोठा भूकंप आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या बंडखोरीवर मार्मिक प्रतिक्रिया दिली.

अशीही खोचक टीका: पुण्यात कोयता हल्ला प्रकरणात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांचा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्या राजकीय घडामोडींवर ठाकरेंना विचारले असता नांदा सौख्य भरे, अशी खोचक टीका केली. ठाकरे यांच्या या टीकेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्वार्थ विरोधात स्वाभिमान अशी लढाई: आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्त्वाचे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागले. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं? रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रिपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी? एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? आणि सर्वांत महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना! तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई आगामी काळात असणार आहे, असे संकेत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिले आहेत.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : आम्ही काँग्रेस-NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, मग आता...; आदित्य ठाकरेंचा प्रहार
  2. Maharashtra Political Crisis : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' दम; राष्ट्रवादीत पडली उभी फूट
  3. NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.