ETV Bharat / state

Navratri 2022 : दसरा, दिवाळीत महालक्ष्मीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी केली जाते परिधान - महालक्ष्मीला वर्षातून दोनदा सोन्याची साडी नेसवतात

सध्या नवरात्रोत्सव ( Navratri 2022 ) सुरू असून देशभरातील अनेक मंदिरांचा वेगवेगळं इतिहास आहे.दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे.पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराला एक वेगळा इतिहास आहे.आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी ही दोनदाच परिधान केली ( Mahalakshmi wear 16 kg gold saree twice a year ) जाते. यामागील इतिहास काय ( History Of Mahalakshmi wear 16 kg gold saree ) आहे.

Navratri 2022
महालक्ष्मीला 16 किलो सोन्याची
author img

By

Published : Oct 1, 2022, 9:50 AM IST

Updated : Oct 1, 2022, 10:27 AM IST

पुणे - सध्या नवरात्रोत्सव ( Navratri 2022 ) सुरू असून देशभरातील अनेक मंदिरांचा वेगवेगळं इतिहास आहे.दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात यंदा नवरात्र उत्सव साजरा करत आहे.पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराला एक वेगळा इतिहास आहे.आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी ही दोनदाच परिधान केली ( Mahalakshmi wear 16 kg gold saree twice a year ) जाते. यामागील इतिहास काय ( History Of Mahalakshmi wear 16 kg gold saree ) आहे.हे जाणून घेऊया ...

महालक्ष्मीला 16 किलो सोन्याची

वर्षातून दोन वेळाच सोन्याची साडी परिधान - पुण्यातील सारसबाग येथे असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण करण्यात आली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची इतकी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात ( Mahalakshmi wear gold saree in Dussehra and Diwali ) येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांकडून गर्दी केली जाते.

सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे 20 वे वर्ष - दक्षिण भारतातील कारागिरांनी 20 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली असून श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे 20 वे वर्ष आहे.पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोन लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरे नुसार सोन्याच्या साडीत देवीच दर्शन व्हावं आणि त्यानिमित्ताने भक्तांना आशीर्वाद मिळावं.हे त्यामागील मुख्य कारण असल्याचं यावेळी विश्वस्त तृप्ती अग्रवाल आणि विश्वस्त एडवोकेट प्रताप परदेशी यांनी सांगितल आहे.

यंदाच नवरात्र उत्सव - श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात यंदा कमलपुष्प सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली देवीच्या गाभा-यात फुलांची व विविध रंगी मखरांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिरात यंदा उत्सवांतर्गत धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम ह होत आहेत. याशिवाय उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होत आहेत.

सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय - उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या ५०० मीटर परिघातील सर्व भक्तांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी होत आहे.

Last Updated : Oct 1, 2022, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.