पुणे - स्वतंत्र भारतात गोपनीयता (प्रायव्हेसी) हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ती व्यवस्था निर्माण केली आहे. आज भारतीय जनता पक्षाने लोकांची प्रायव्हेसी संपवण्याचा काम सुरु केले आहे. मध्यप्रदेश आणि कर्नाटकात ब्लॅकमेलिंग करून भाजपनेच सत्ता मिळवली, हेही सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही शब्द बोलायला तयार नाही. हेच खऱ्या अर्थाने 'चोर के दाढी मे तिनका' आहे. दाढी कोणाची आहे हे आपल्याला माहीतच आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली. काँग्रेस नगरसेवक आबा बागूल यांच्यावतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पाठवण्यात येत आहे. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जासुसी करणे काँग्रेसचे काम नाही तर केंद्राचे आहे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र भेट हा एक योगायोग होता. ही वेळ राजकारणाची नाही. जासुसी करणे आमचं काम नाही. जासुसी करण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. लोकांची प्रायव्हेसी संपवली आहे. इतकी मोठी घटना घडूनही लोकसभेत कोणीही बोलायला तयार नाही. आमचे काम हे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करणे आहे. कोण कोणाला भेटले याबाबत जासुसी करणे आहे, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - नोटा बंदीने जनतेवर भीक मागण्याची वेळ - संजय राऊत
गाजावाजा न करता सेवा धर्म मानून काँग्रेसतर्फे पुरग्रस्तांना मदत -
काँग्रेस नगरसेवक आबा बागूल यांच्या नेतृत्वात 80 लोकांची टीम पूरग्रस्त भागतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी तसेच तेथे जाऊन साफसफाई करण्यासाठी जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण येथे ही मदत काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे. फक्त याचा कोणत्याही प्रकारे गाजाबाजा केला जात नाही आहे. कारण ही मदत आहे. अडचणीत आलेल्या लोकांना अडचणीतून बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे. सेवा हा काँग्रेस पक्षाचा मूळ धर्म आहे आणि त्यातून ही मदत केली जात आहे. ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे जे काही संकट आज महाराष्ट्रावर आले आहे त्यासाठी राज्य सरकार भरीव मदत करत आहे. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जे काही राजकारण करण्यात येत आहे ते चुकीचे असून यात राजकारण न करता सर्वांनी एकत्र यायला हवे. केंद्राकडून काहीही मदत होत नाही आहे. तरीही राज्य सरकार लोकांना मदत करत आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याला कसे पुढे नेता येईल, यासाठी महाविकास आघाडी सरकार काम कारत आहे, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - म्हणजे तुम्ही दुधाने धुतल्या आहेत का? पाणी प्रश्नावरून यशोमती ठाकुरांनी महिला अधिकाऱ्याला झापलं