पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस हा बाप-लेकापुरता शिल्लक राहिलेला पक्ष आहे. गेल्या 20 वर्षात शरद पवारांनी महाराष्ट्रात फोडफोडीचे राजकारण केले. त्यामुळे त्यांना टीका करायचा आधिकार नाही, असा टोला भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला आहे. ते राजगुरुनगर येथे भाजप विजय संकल्प बुथ मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा - पाहा...बारामतीच्या स्टेडियमबद्दल केदार काय म्हणाला
पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोडाफोडीच्या राजकारणात पुर्वी धनजय मुंडे, छगन भुजबळ, गणेश नाईक हे नेते बाहेरच्याच पक्षातुन आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळी शिवसेना, काँग्रेस, भाजपमधून फोडुन आणलेलीच पवारांची सेना होती. त्यामुळे तुम्हाला जर तुमची माणसे सांभाळता येत नसतील, तर त्याची कारणे तुम्ही शोधा, आम्हाला दोष देऊ नका, असा सल्ला भाजप भांडारी यांनी दिला आहे.
हेही वाचा - संतापजनक! मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
खेड तालुक्यात गेल्या 5 वर्षात भाजपची ताकद वाढली आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, गाव सोसायट्यांवर भाजपने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे राज्यात जरी युती झाली तरी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भांडारी यांनी सांगितले.
- अमोल कोल्हेंची बांधिलकी भगव्याशी प्रामाणिक नाही -
अमोल कोल्हें संभाजी राजांची भुमिका करतात. त्याचे त्यांना पैशे मिळतात. त्यामुळे अमोल कोल्हेंची बांधिलकी भगव्याशी प्रामाणिक नाही, असा टोला भांडारी यांनी लगावला.