ETV Bharat / state

पुण्यात 18 हजार रेमडेसीवीरची मागणी; पुरवठा मात्र 4 हजाराच - पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा बातमी

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीरचा इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. पुणे शहराची रेमडेसीवीर इंजेक्शनची दररोजची मागणी 18 हजाराची आहे. परंतु पुरवठा केवळ 4 हजार इंजेक्शनचाच होत असल्याचे समोर आले आहे.

low supply of remdesivir injection in pune
पुण्यात 18 हजार रेमडेसीवीरची मागणी; पुरवठा मात्र 4 हजाराच
author img

By

Published : Apr 16, 2021, 5:43 PM IST

पुणे - शहरातील सातत्याने वाढत जाणारी कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीरचा इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे शहराला या इंजेक्शनचा पुरवठाच झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही, तर पुणे शहराची रेमडेसीवीर इंजेक्शनची दररोजची मागणी 18 हजाराची आहे. परंतु पुरवठा केवळ 4 हजार इंजेक्शनचाच होत असल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया

पुरठ्यापेक्षा मागणी जास्त -

पुणे जिल्ह्याची रेमडेसीवीर इंजेक्शनची दररोजची मागणी ही 1800 इतकी आहे. मात्र पुरवठा केवळ 4 हजार इतका होतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांत रेमडेसीवीरवरून गोंधळ वाढला आहे. सद्यस्थितीत पुणे शहराला 45000 रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज आहे. कमी पुरवठा होत असल्यामुळे हा आकडा रोज वाढतच आहे. या इंजेक्शनचा अधिक पुरवठा व्हावा, यासाठी केंद्र शासनाला राज्य शासनाने ही विनंती केली आहे. उत्पादकांनाही त्यांची उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठीचे आदेश दिले आहे. परंतु हे इंजेक्शन उत्पादन करण्यासाठी लागणार कालावधी 20 दिवसांचा आहे. इंजेक्शन तयार झाल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागत असल्याने तुडवडा जाणवत आहे.

सात कंपन्या करतात उत्पादन -

सद्यस्थितीत 78 टक्के कोरोनाबधित रुग्णांना डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सध्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या 7 कंपन्या आहेत. यातील मुख्य कंपनी असलेल्या हेक्ट्रो फार्मा कंपनीत दिवसाला 35000 इंजेक्शन तयार होतात. तर इतर 6 कंपन्या मिळून 30 ते 35 हजार इंजेक्शन तयार करतात. एका दिवसात साधारण 70 हजार इंजेक्शन तयार होतात. त्याचे वितरण संपूर्ण भारतात होत असते. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे त्यातील मुख्य भाग महाराष्ट्रात येतो. या इंजेक्शनचा दररोज पुरवठा झाला, तर अडचणी काही प्रमाणात कमी होतील. परंतु मागील दोन दिवसांत या इंजेक्शनचा पुरवठाच झाला नसल्यामुळे टंचाई वाढली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रतापवार यांनी दिली.

हेही वाचा - पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या, उद्या होणार मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.