ETV Bharat / state

Love Jihad: मंचरमध्ये लव्ह जिहाद; आई वडिलांनी द केरल स्टोरी पाहून मुलीला शोधले - mla Gopichand Padalkar

'द केरल स्टोरी' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. पुणे जिल्ह्यात मंचर येथील लव्ह जिहादची घटना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उघडकीस आणली आहे. द केरल स्टोरी या चित्रपटानंतर राज्यात पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा पुढे आला आहे. आता याबाबत काही प्रकरणे देखील समोर येत आहेत. संबंधित तरुणावर कडक कारवाई करावी अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

Love Jihad
मंचरमध्ये लव्ह जिहाद
author img

By

Published : May 26, 2023, 8:29 PM IST

माहिती देताना आमदार गोपीचंद पडळकर

पुणे : गेल्या काही वर्षात देशात लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. द केरल स्टोरीला सुरूवातीला विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकू शकला. सिनेमा दोन आठवड्यात कोटींची कमाई केली. दरम्यान अनेक प्रेक्षक द केरळ स्टोरी पाहण्यासाठी थिएटरकडे वळले. तर अनेक संमिश्र प्रतिक्रिया सिनेमा पाहून समोर आल्या आहेत. द केरल स्टोरी सिनेमा पाहिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील लव्ह जिहाद प्रकरणाचा शोध लागला आहे.

चित्रपट पाहून मुलीची आठवण: पुण्यात पत्रकार परिषद मध्ये गोपीचंद पडळकर यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी देखील एक लव्ह जिहाद प्रकरण झाले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, संबंधित पीडितेला चार वर्षापूर्वी तिने दहावीची परीक्षा देऊन तिला पळवून नेले होते. त्यांनतर घरच्यांनी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. पण आता या पीडितेच्या घरच्या लोकांनी द केरला स्टोरी हे चित्रपट पाहून त्यांच्या मुलीबाबत काय बरे वाईट घडले का? याचा पुन्हा तपास केला. त्यांनी त्या पीडितेला शोधून काढले आणि त्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी देखील एक लव्ह जिहाद प्रकरण झाले. मुलाने त्या पीडितेला सिगारेटचे चटके दिले, बिफ खायला लावून नमाज पठण करायला लावले. पोलिसांनी याचा तपास करावे आणि त्या मुलावर कडक कारवाई करावी. - आमदार गोपीचंद पडळकर

असा दिला तिला त्रास: या प्रकरणी त्या मुलाने त्या पीडितेला सिगारेटचे चटके दिले होते. तसेच बिफ खायला लावून नमाज पठण करायला लावले. पोलिसांनी याचा तपास करावे आणि त्या मुलावर कडक कारवाई देखील करावी, अशी मागणी देखील केली. तसेच पुणे जिल्ह्यात असे प्रकरण जर घडत असतील तर ते खूप गंभीर असल्याचे पडळकर म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती : दर वर्षी 31 मे ला चवंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदा राज्य सरकारच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी होणार आहे. हे पहिल्यांदा अस घडत आहे की, सरकार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करत आहे.आता यावरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात वाद सुरू झाले आहे. या ठिकाणी स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. याबाबत पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले की, सरकारने या वर्षी कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे त्यांचे नाव देखील पत्रिकेत आहे. गेल्या वर्षीच विषय आणि आताचा विषय वेगळा आहे.

रोहित पवार यांच्यावर टिका: नातू आणि आजोबा सरकार होती म्हणून ते चवंडीला गेले होते. आता त्यांना कार्यक्रम घ्यायची काहीही गरज नाही. त्यांनी कधीही कार्यक्रम घेतला नाही. नातवाला लॉन्च करायचे होत म्हणून आजोबांनी त्याला घेऊन आले होते. पण आता जनता हुशार झाली आहे. लोकांनी दगडी मारली आणि त्या नंतर त्यांना ढुंगणाला पाय लावून पळाव लागले. आता हे नाटक कश्याला परवानगी नसताना देखील कार्यक्रम घ्यायचे ना. पण त्यांना आता राजकारण करायचे आहे. अशी टिका यावेळी पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे.

पडळकर यांची टिका: पुण्यात एका मुलाने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अस जर गंभीर प्रकरण असेल तर यात लक्ष घालणार. ज्यांच्यामुळे हे घडल आहे त्याच्यावर कारवाई करण्यास सांगणार आहे. असे देखील यावेळी पडळकर म्हणाले. महविकास आघाडीच्या जागावाटप बाबत पडळकर यांना विचारले असता ते म्हणाले की, महविकास आघाडी अनैसर्गिक असून हे कोणत्याही विचाराने एकत्रित आलेले नाही तर, सत्तेसाठी एकत्रित आले आहे. यांच्यात कायम मतभेद राहणार आहे. फक्त भाजपला विरोध करण्यासाठी हे एकत्रित आलेले आहे. नवरा बायकोच जस भांडण होत तसे त्यांचे भांडण असल्याची टीका यावेळी पडळकर यांनी केली.

हेही वाचा -

  1. Sangeeta Patil Story स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने केली आखाती देशात तस्करी झालेल्या महिलांची सुटका वाचा संपूर्ण सुटकेचा थरार
  2. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी चित्रपटावरुन राजकारण तापले
  3. Devendra Fadnavis on Love Jihad मध्यप्रदेश कर्नाटकच्या धर्तीवर लव्ह जिहाद प्रकरणे तपासणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.