ETV Bharat / state

भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर आवास योजनेची सोडत रद्द - पुणे पंतप्रधान आवास योजना सोडत न्यूज

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील रावेत, बोऱ्हाडेवस्ती आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महानगरपालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधणार असून त्याची सोडत चिंचवड येथील नाट्यगृह रामकृष्ण मोरे येथे होणार होती. 48 हजार नागरिकांनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरले असून त्याची सोडत असल्याने नाट्यगृह येथे हजारो नागरिक उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला.

भाजप आणि राष्ट्रवादी पुणे न्यूज
भाजप आणि राष्ट्रवादी पुणे न्यूज
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:01 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची सोडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. मात्र, पाटील यांचे पिंपरी-चिंचवड शहरासाठी योगदान काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले नसल्याचे सांगत निदर्शने करत या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार विरोध केला. सोडत असलेल्या नाट्यगृहाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. यामुळे सोडत रद्द करण्यात आली.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर आवास योजनेची सोडत रद्द

या वेळी, महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते, या सर्व राजकीय रंगामुळे आजची सोडत अखेर सत्ताधारी भाजपला रद्द करण्याची नामुष्की ओढवली. राष्ट्रवादी पक्षाने श्रेय लाटण्यासाठी खटाटोप केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, सर्व नियमांचे पालन करून ऑनलाइन पद्धतीने लवकरच सोडत काढण्यात येईल, अशी माहिती महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - पंढरपूर; वाळू चोरी प्रकरणातील 36 गाढवे निघाली उटीला

अन् पंतप्रधान आवास योजनेची सोडत थांबवली

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील रावेत, बोऱ्हाडेवस्ती आणि चऱ्होली या तीन ठिकाणी महानगरपालिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधणार असून त्याची सोडत चिंचवड येथील नाट्यगृह रामकृष्ण मोरे येथे होणार होती. 48 हजार नागरिकांनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरले असून त्याची सोडत असल्याने नाट्यगृह येथे हजारो नागरिक उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला.

भाजप आणि राष्ट्रवादीचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय नाट्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची निराशा झाली. हे दोन्ही पक्ष एकमेकांना दोषी ठरवत आहेत. या प्रकरणी भाजपचे सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले की, 'राष्ट्रवादीने श्रेय लाटण्यासाठी आजच्या सोडतीला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रीतसर निमंत्रण दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावाखाली हे सर्व झाले आहे.' तर, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ म्हणाले की, 'आम्ही सर्वसामान्य जनतेच्या फसवणूक थांबवली असून पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रण आहे. मात्र, कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत आहे. त्यांना रीतसर आमंत्रण भाजपने द्यावे. तसेच, कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते व्हावा.' शिवाय, रावेत येथील आवास योजनेची जागा न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक; नाशिकमध्ये रस्त्याकडेला आढळले अवघे तीन महिन्यांचे बाळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.