ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Shivsena : ही त्यांची मिलिजुली कुस्ती; एमआयएमच्या प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

author img

By

Published : Mar 20, 2022, 3:19 PM IST

अजाण स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएमसोबत युती करायचा विचार करणार तेच आणि आरोपही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत, असा पलटवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला. ( Lop Devendra Fadnavis Criticize Shivsena ) ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ( Devendra Fadnavis in Maval )

Devendra Fadnavis on Shivsena
एमआयएमच्या प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

पिंपरी-चिंचवड - अजाण स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएमसोबत युती करायचा विचार करणार तेच आणि आरोपही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत, असा पलटवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला. ( Lop Devendra Fadnavis Criticize Shivsena ) ते मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ( Devendra Fadnavis in Maval )

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना

देवेंद्र फडणवीस हे आज मावळ दौऱ्यावर असून बैलगाडा शर्यतील उपस्थिती लावली आहे. शर्यत सुरू व्हाव्यात म्हणून मी एक कमिटी स्थापन केली. त्यांनी बैल धावणारा प्राणी आहे, हे त्यातुन आपण सिद्ध करून दिलं. हाच अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला, तेव्हा ही शर्यत झाली. मला आज आनंद आहे, माझा बैलगाडा इथं धावला, पहिला नंबर ही आला. 2014 आणि 2019ला देखील जनतेने आम्हाला पहिलं आणलं, पण काहींनी शाळा केली. मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला, तो कधी मागे हटत नाही.

हेही वाचा - येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार, भाजपाचे हिंदुत्व केवळ राजकारणासाठी - मुख्यमंत्री ठाकरे

याआधी काय म्हणाले संजय राऊत?

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांशी कधीही युती होऊ शकत नाही. या राज्यात कोणीही एमआयएमसोबत ( AIMIM ) जाणार नाही. शिवसेनेला एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मोठं कटकारस्थान असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी केला आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एमआयएमचा वापर करत असून ( Sanjay Raut criticize BJP and MIM ) त्या उद्दिष्टाने अशा प्रकारच्या ऑफर समोर आणल्या जात आहेत. मात्र, एमआयएमसोबत शिवसेना कधीही युती करणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. या प्रस्तावाचा आधार घेऊन शिवसेनेला भारतीय जनता पक्ष 'जनाब सेना' म्हणत आहे. त्या भाजपाने आपला इतिहास तपासून पहावा. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी संबंध असलेल्या मेहबूबा मुक्तीसोबत मिळवणी करून भाजपने सरकार स्थापन केलं होतं, हे भाजप विसरला का? असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.