पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री येण्यापूर्वीच सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने सभास्थानी कुल यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेले भले मोठ्ठे बॅनर कोसळले. या घटनेत सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही.
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शहरातल्या कात्रज, आंबेगाव आणि हडपसरसह अनेक भागात हा पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातही बारामती आणि पुरंदर भागातही वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली होती.