पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी पेट्रोल बंद करण्यात आले आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक पेट्रोलपंपावर नियम धाब्यावर बसवून सर्रास पेट्रोल-डिझेल विक्री सुरू आहे. पेट्रोल भरण्यासाठी नागरिक लांबच लांब रांगा लावत आहेत.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे-मुंबई परिसरात असल्याने पोलीस प्रशासन दिवसरात्र लॉकडाऊन कडक करण्यासाठी काम करत आहे. मात्र, ग्रामीण भागात शेतीच्या कामांची कारणे देत नागरिक बाहेर पडत आहेत. त्यांना वाहनांना लागणारे पेट्रोल-डिझेलही सहज उपलब्ध होत आहे. पेट्रोल पंप चालकही नागरिकांना पेट्रोल विक्री करत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.