ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : दिव्यांग व्यावसायिकावर उपासमारीची वेळ; आर्थिक भार सोसवेना - पिंपरी चिंचवड लॉकडाऊन इफेक्ट

हरेश्वर गाडेकर आणि त्यांची पत्नी रत्ना असे या दिव्यांग दाम्पत्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. दिव्यांग हरेश्वर यांचा ट्रॉफी बनवण्याचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊन काळात तो ठप्प झाला. यामुळे दिव्यांग गाडेकर कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

hareshwar gadekar
हरेश्वर गाडेकर
author img

By

Published : Jul 3, 2020, 2:42 PM IST

पुणे - संपुर्ण जगात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात 24 मार्चला लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर सर्वच व्यवसाय ठप्प झाले. तर यादरम्यान काही ठिकाणी सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, संपूर्ण देश लॉकडाऊन होऊन आता 3 महिन्यांपासून अधिक कालावधी झाला आहे. या काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर येथील एका दिव्यांग कुटुंबालाही उपासमारीला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

लॉकडाऊन इफेक्ट : दिव्यांग व्यावसायिकावर उपासमारीची वेळ; आर्थिक भार सोसवेना

हरेश्वर गाडेकर आणि त्यांची पत्नी रत्ना असे या दाम्पत्याचे नाव आहे. हरेश्वर आणि रत्ना हे दोघे दिव्यांग आहेत. ते पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. दिव्यांग हरेश्वर यांचा ट्रॉफी बनवण्याचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊन काळात तो ठप्प झाला. यामुळे दिव्यांग गाडेकर कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या आठ वर्षांपासून हरेश्वर हे ट्रॉफी बनवण्याच्या व्यवसाय करत आहेत. अगोदर ते घरातच व्यवसाय करत. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांनी व्यवसाय एका छोट्या टपरीमध्ये सुरू केला. व्यवसाय व्यवस्थित सुरू होता. महिन्याला दुकानाचे भाडे जाऊन 25 ते 30 हजार रुपये मिळत होते. सर्व काही सुरळित चालले होते. मात्र, अचानक कोरोना विषाणूचे संकट आले आणि सर्व काही बदलून गेले.

हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : 5 महिन्यांनंतर 'त्या' शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली, 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळणार लाभ

गेल्या चार महिन्यांपासून व्यवसाय बंद आहे. ट्रॉफी बनवण्याच्या मशीनदेखील धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळे हरेश्वर यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. तेच दूर करण्याचा प्रयत्न सध्या ते करत आहेत. कुटुंबाचे आर्थिक संकट टाळण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आणि लाकडी स्टॅण्ड विकण्याचा जोड व्यवसाय हरेश्वर यांनी दुकानात सुरु केला आहे. यातून काहीसा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यांपासून दुकान बंद आहे. मी ट्रॉफी बनवण्याचे काम करतो. काहीतरी नवीन करायचे म्हटले तर दिव्यांग व्यक्तीला कोणी मदत करत नाही. लॉकडाऊनमध्ये बसूनच आहे. कोरोनाला बाहेर पडून हरवणे फार महत्वाचे आहे. म्हणून पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसाय अगदीच ठप्प झाला आहे. लॉकडाऊनच्या आधी महिन्याला 25 ते 30 हजार मिळायचे. मात्र, सध्या तीन हजार रुपयेही मिळणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तर त्यांच्या पत्नी रत्ना म्हणाल्या, गेल्या काही महिन्यांपासून दुकान बंद आहे. संसारात खूप अडचणी आल्या आहेत. पर्याय नाही, काही जणांनी मदत केली. मुलगा 4 महिन्यांचा आहे. सगळाच खर्च वाढलेला आहे. दिवाळीपर्यंत व्यवसाय सुरळीत होतील, असे वाटत नाही, अशी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत सरकारने दिव्यांगांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.