पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये खोदकाम करत असताना ब्रिटिशकालीन जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली. घटनास्थळी बॉम्बनाशक आणि शोधक पथक, पिंपरी पोलीस दाखल झाले होते. दरम्यान हा बॉम्ब पिंपरी पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात आला आहे.
पिंपरीतील कोहिनूर सोसायटीचे सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. तेव्हा जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. तेव्हा बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस, बिडीडीएसच पथक घटनस्थळी दाखल झाले. संबंधित वस्तू ही ब्रिटिश कालीन असल्याचे सांगितले जात असून बॉम्ब जिवंत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक केंगर यांनी दिली आहे. त्याला निकामी करण्याचे काम लवकरच केले जाईल असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, अशाप्रकारे बॉम्ब आढळल्याची पहिलीच घटना नव्हे. याअगोदर देखील अनेकदा अशा घटना घडल्या यापरिसरात घडलेल्या आहेत.