पुणे - जुन्नर तालुक्यातील राजुरीमध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. सध्या उसतोडणी सुरू असल्याने उसामध्ये वास्तव्य करणारा बिबट्या व बछडे बाहेर पडू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणासह त्याच्या आईवरही गुन्हा दाखल
जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या शेतात 1 आणि आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील विश्वनाथ विश्वासराव यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची 3 बछडी आढळून आली. त्यामुळे सर्वत्र बिबट्याची दहशत पसरली आहे.
दरम्यान, बिबट्या मादी आणि बछडे भरकटले जाऊ नये, यासाठी ऊसतोडणी मजूर आणि वनविभागाच्या मदतीने या बछड्यांना त्यांच्या आईच्या कुशीत सोडण्यात आले आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्या मादीचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - सह्याद्रीची यशोगाथा..! दुर्गसंवर्धनाच्या कार्याचा पुण्यात सादर होणार लेखाजोखा...