ETV Bharat / state

पुण्यात टँकरमधून अॅसिटिक अॅसिडची गळती; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील घटना

author img

By

Published : May 28, 2020, 7:33 AM IST

Updated : May 28, 2020, 9:49 AM IST

मुंबई-बंगळुरू महामार्गावर बावधन जवळील चांदणी चौकात अॅसिडच्या टँकरमधून अचानक गळती सुरू झाल्याने एकच धावपळ उडाली. टँकरमधून होणारी गळती रोखण्यासाठी अग्निशामक दलाचे पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Acid tanker
अॅसिड टँकर

पुणे - मुंबई-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकात अॅसिटिक अॅसिडच्या टँकरमधून अचानक गळती सुरू झाल्याने एकच धावपळ उडाली. बुधवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. अॅसिटिक अॅसिड भरलेला हा टँकर मुंबईवरून निरेच्या दिशेने निघाला होता. बावधन जवळील चांदणी चौकात येताच या टँकरमधून अचानक गळती सुरू झाली.

पुण्यात टँकरमधून अॅसिटिक अॅसिडची गळती

टँकरमधील अॅसिड जवळच्या परिसरात पसरल्याने काही नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. तर काही नागरिकांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास झाला. याची माहिती मिळताच टँकरमधून होणारी गळती रोखण्यासाठी अग्निशामक दलाचे पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली.

Last Updated : May 28, 2020, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.