बारामती(पुणे) : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी पसरवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'ज्यांना माझी कामे दिसत नाहीत. ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतात' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चांवर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे.
-
NCP chief Sharad Pawar is our top leader. His resignation issue is over now, there is no point discussing that again and again... MVA will remain united always: NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/QRf7mzJVk1
— ANI (@ANI) May 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NCP chief Sharad Pawar is our top leader. His resignation issue is over now, there is no point discussing that again and again... MVA will remain united always: NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/QRf7mzJVk1
— ANI (@ANI) May 7, 2023NCP chief Sharad Pawar is our top leader. His resignation issue is over now, there is no point discussing that again and again... MVA will remain united always: NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/QRf7mzJVk1
— ANI (@ANI) May 7, 2023
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, त्या समितीत आम्ही २५ जण होतो. पवारांना भेटायला गेल्यावर त्यांनी आमच्यापैकी मोजक्याच लोकांना पत्रकार परिषदेला येण्यास सांगितले. त्यात प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, केरळचे प्रतिनिधी, यांचा समावेश होता. काही ठराविक लोकच तेथे होते. पवार साहेबांनी आम्हाला येऊ नका असे सांगितले. साहेबांच्या आदेशामुळे आम्ही आलो नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, पक्षाचे सदस्य अजित पवार यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, आपल्या पुतण्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
अफवांमध्ये तथ्य नाही : अजित राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या अफवांनंतर शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी खूप चर्चा होती, पण तसे झाले का? त्यांच्याबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही.
अजित पवार आवडणीरी व्यक्ती : अजित पवार यांचे कौतुक करताना राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले की "अजित यांचा स्वभाव वेगळा आहे. तळागाळात काम करायला आवडणारी व्यक्ती आहे. ते मीडिया फ्रेंडली नाहीत. ते फक्त पक्ष आणि राज्यासाठी काम करतात." त्याच्याबद्दल विरोधक खोट्या अफवा पसरवत असुन अजित पवार यांची बदनामी करण्याच प्रयत्न होतांना दिसत असल्याचे पवार म्हणाले.
राजीनाम्याचे समर्थन : शरद पवारांच्या या वक्तव्यानंतरही राजीनामा मागे घेतल्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याची उत्सुकता लोकांना आहे. अजित पवार यांनीच शरद पवार यांच्या राजीनाम्याचे समर्थन केले होते. पक्षाच्या इतर नेत्यांना त्याचा आदर करण्यास त्यांनी सांगितले होते.
विरोधकांची एकजूट सुरू : 82 वर्षीय शरद पवार यांच्या अचानक राजीनाम्यामुळे विरोधी एकजुटीच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला वर्षभर उरले असून विरोधकांची एकजूट सुरू झाली आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करणे माझ्याकडून शक्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शरद पवार आज बारामतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.