ETV Bharat / state

बारामतीत अजित पवारांच्या हस्ते 2 रूग्णवाहिकांचे लोकार्पण, कन्हेरीत उद्यानाचे भूमिपूजन - बारामतीत अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशनच्या वतीने बारामती येथील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी 2 रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. तसेच, कन्हेरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचेही भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले.

baramati
बारामती
author img

By

Published : Jun 5, 2021, 5:24 PM IST

बारामती (पुणे) - स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशनच्या वतीने बारामती येथील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी 2 रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी 'एसबीआय'चे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग, महाव्यवस्थापक श्रीमती सुखविंदर कौर उपस्थित होते.

बारामतीत अजित पवारांच्या हस्ते 2 रूग्णवाहिकेंचे लोकार्पण

विधवा-दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 1001 रुपये

मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्यामार्फत 15 सॅनिटायझर, सुपे येथील 85 निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 1001 रुपयांचा धनादेशाचे वाटप अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयुरेश्वर प्रतिष्ठानचे सुशांत जगताप व तुषार हिरवे उपस्थित होते.

दात्यांकडून कोरोना लढ्यासाठी मदत

याचबरोबर मॅग्नम एंटरप्रायझेस यांच्याकडून कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी लागणारी काही औषधे व वैद्यकीय साधनसामुग्री मदत म्हणून देण्यात आली. बारामती येथील हॉटेल डोसा प्लाझाचे योगेश भगवान पानसरे व दिनेश मोहन पानसरे यांच्याकडूनही कोविड 19साठी मदत म्हणून 25 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कन्हेरीत उद्यानाचे भूमिपूजन

बारामती येथील कन्हेरी गावामध्ये वन विभागाकडून नवीन उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यात आज जागतिक पर्यावरण दिन आहे. त्याचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

हेही वाचा - मंदिरे उघडा अन्यथा रस्त्यावर उतरू, भाजपा अध्यात्मिक आघाडीचा ठाकरे सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.