ETV Bharat / state

लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

विकेंड असल्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य बाजारपेठ आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. भुशी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना लोणावळा पोलिसांनी थांबवून परत पाठवले. दरम्यान, दुपारी चार वाजेपर्यंत अशीच परिस्थिती होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jun 13, 2021, 7:34 PM IST

Updated : Jun 13, 2021, 8:17 PM IST

लोणावळा
लोणावळा

लोणावळा (पुणे)- लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून पर्यटनस्थळी जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे लोणावळा परिसरातील डोंगर हिरवळीने नटले आहेत. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी कोरोनाचे नियम डावलून गर्दी केल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, पर्यटकांनी नियम पायदळी तुडवू नयेत, अद्याप पर्यटनस्थळावरील बंदी उठलेली नाही, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी

वाहनांची झाली गर्दी

विकेंड असल्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य बाजारपेठ आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. भुशी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना लोणावळा पोलिसांनी थांबवून परत पाठवले. दरम्यान, दुपारी चार वाजेपर्यंत अशीच परिस्थिती होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. पर्यटकांना लोणावळ्यात येण्यास मज्जाव नाही. परंतु, पर्यटनस्थळावरील बंदी उठवण्यात आली नसल्याने नियम डावलून जाऊ नये, असे वाहन पवार यांनी केले आहे.

हेही वाचा-अभय बंग हे जगव्यापी समाजसुधारक, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र व्यसनमुक्त - विजय वडेट्टीवार

Last Updated : Jun 13, 2021, 8:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.