ETV Bharat / state

पावसामुळे ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

कोकणात जोरदार पाऊस पडत असून निवे गावालगत असलेल्या ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे.

ताम्हिणी-कोलाड
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:45 AM IST

Updated : Sep 4, 2019, 10:53 AM IST

पुणे - कोकणात जोरदार पाऊस पडत असून निवे गावालगत असलेल्या ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे पुणे-कोलाड सस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. गेल्या महिन्यात याच घाटामध्ये दरड कोसळ्यामुळे दोन दिवस वाहतूक ठप्प होती.

दरड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुणे-कोलाडला जोडणाऱ्या घाटात अनेक वाहने अडकली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त घरी गेलेल्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे.

हे ही वाचा - मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, गणेशोत्सव काळातही सुरू असलेल्या शाळांना सुट्टी

गेल्या काही वर्षांमध्ये ताम्हिणी घाट रस्त्यामार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या या भागातील रस्त्याची रुंदी कमी-अधिक स्वरूपाची आहे. परिसरात जोराचा पाऊस आणि धुके आहे. रस्ता निसरडा झाला असून वाहन चुकीच्या बाजूने गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

हे ही वाचा - हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला; मुसळधार पावसाने वादळसदृश्य परिस्थिती​​​​​​​

गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर परतलेला पाऊस राज्यभर कोसळत आहे. मंगळवारी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसाने रात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भात बरसत आहे. गडचिरोलीत १०० गावांचा संपर्क तुटला आहे. तर, कोकण व पुण्यात धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:Pune:-
पुण्यातुन कोकणात जाणाऱ्या ताम्हीणी-कोलाड रस्त्यावर निवे गावालगत पुन्हा दरड कोसळल्याने पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मागील महिण्यात या घाटात दरड कोसळल्याने दोन दिवस वाहतुक ठप्प होती. ही दरड कोसळल्याने गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या चाकरमाण्यांचे हाल झाले आहेत.Body:..Conclusion:..
Last Updated : Sep 4, 2019, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.