ETV Bharat / state

Gudipadwa 2023 : गुढीपाडव्याला साखरगाठीचे विशेष महत्त्व; 'अशी' बनवतात साखरगाठ

गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुरू होते. तसेच साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते, तसेच नवनवीन दागिने देखील खरेदी केले जातात. या दिवशी साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या साखर गाठेला देखील फार महत्त्व आहे. पुण्यातील भवानी पेठेत राज्यातील सर्वात मोठी म्हणजेच पाच किलोची साखर गाठ ही तयार करण्यात आली आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेवू या.

Gudi Padwa 2023
गुढीपाडव्याची साखरगाठ
author img

By

Published : Mar 20, 2023, 6:41 AM IST

Updated : Mar 21, 2023, 9:07 PM IST

प्रतिक्रिया देताना गणेश डिंबळे

पुणे : गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचे देखील विशेष महत्त्व आहे. घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून दिला जातो. पुण्यातील भवानी पेठ येथे गणेश डिंबळे यांचा वडिलोपार्जित कारखाना आहे. यात ते साखर गाठ आणि तिळगुळ बनवत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर साखरगाठी ही बनवली जाते. साखर गाठ कशी बनवतात? तर एक सागवानी लाकडाचे साचे असतात, त्या साच्यामध्ये नकशी ही पहिल्यापासूनच कोरलेली असते. यात दोरा लावून तयार केलेला साखरेचा पाक हे टाकण्यात येतो. काही वेळाने नक्षीदार पांढरी शुभ्र अशी साखरगाठ ही तयार होते. जरी पद्धत सोपी असली तरी हे तयार करण्यासाठी खूप मेहनत असते. कामगार हे लवकर भेटत नाही. जास्त करून यामध्ये बाहेरील राज्यातील कामगार हे आपल्याला काम करताना पाहायला मिळतात.

यंदा मोठ्या प्रमाणावर मागणी : हा साखर गाठीचा व्यवसाय आमच्या वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गेल्या 40 ते 50 वर्षापासून आमचा हा व्यवसाय असाच सुरू आहे. कोरोनामुळे सर्वानाच आर्थिक फटका बसला. आम्हाला देखील याचा मोठा आर्थिक फटका बसला होता. पण यंदा मोठ्या प्रमाणावर धंदा आहे. दरोरोज 300 किलो गाठी हे यंदा दरोरोज विकले जात आहे. तसेच बाजारात मागणी देखील जास्त असल्याचे यावेळी गणेश डिंबळे म्हणाले.

Gudi Padwa 2023
गुढीपाडव्याची साखरगाठ

पाच किलोची साखरगाठ : राज्यात आपल्याला ठीकठिकाणी साखरगाठ हे पाहायला मिळतात, पण गणेश डिंबळे यांनी राज्यातील सर्वात मोठी म्हणजेच पाच किलोची साखर गाठ ही तयार केली आहे. यात स्वामींचा फोटो आहे. तसेच त्याबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखील फोटो आहे. पुण्यातील मंडई येथील शारदा गणपतीचा फोटो देखील या गाठीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या गाठी पुण्यातील सर्वच देवस्थान तसेच मंदिरांमध्ये जात असते, हे याचे वैशिष्ट्य असल्याचे यावेळी गणेश डिंबळे यांनी सांगितले.

महागाईचा फटका : गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे दर तसेच वाढत असलेले गॅसचे दर यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. तसाच या महागाईचा फटका या साखरगाठीना बसला आहे. किंमती मागे 20 रू एवढी वाढ यंदा झाली आहे. ही वाढ जरी होलसेलमध्ये झाली असली, तरी रिटेलमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. गुढीपाडव्याला साखरगाठीचे विशेष महत्त्व असते.

हेही वाचा : Horoscope : 'या' राशीवाल्यांना आठवड्याचा पहिला दिवस असेल समाधानी; वाचा, राशीभविष्य

Last Updated : Mar 21, 2023, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.