डिसेंबर महिन्यात गौरवचे वडील भानू खळदे आणि किशोर आवारे यांचे नगर परिषदेत सीईओच्या दालनात खडाजंगी झाली होती. किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. याचाच राग मनात धरून गौरवने ही हत्या घडवल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. गौरव हा उच्चशिक्षित असून तो त्यांचा बांधकाम व्यवसाय सांभाळायचा. दरम्यान, हत्येमधील आरोपी शाम निगडकर हा गौरवचा मित्र होता. तो त्याला आर्थिक मदत देखील करायचा. याच मैत्री खातर श्याम आणि इतर जणांनी ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या : किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आवारे यांची आई यांनी दिलेल्या तक्रारीत हे आरोप करण्यात आले आहेत. पुण्याच्या तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला वेगळे वळण आले असून या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
|
हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला आहे. त्यापैकी जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला तर दोन जणांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अधिक तपास पिंपरी- चिंचवड पोलीस करत आहेत : अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिीस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा, यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून ते लढा देत होते. गेल्या काही वर्षांपासून सुनील शेळके यांचा प्रतिस्पर्धी म्हणून किशोर आवारे यांना पाहिलं जाते होते. अनेक कामांना आवारे यांनी विरोध केला होता. त्यांनी आंदोलने केली होती. माझ्या जीवाला तीन ते चार जनांपासून धोका असल्याचे त्यांची आई माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे यांना सांगितले होते. या घटनेचा अधिक तपास पिंपरी- चिंचवड पोलीस करत आहेत.
हेही वाचा
2. हेही वाचा : Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट येणार
3. हेही वाचा : Akola Crime : 2 गटातील दगडफेकीत एकाचा मृत्यू दहा जखमी, अकोल्यात कलम 144 लागू