ETV Bharat / state

खेड तालुक्यात महिला पोलीस पाटलांकडून अवैद्य दारू अड्डे उद्धवस्त - अवैद्य दारूविक्री

दारूबंदी असताना अवैद्य दारू विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी तरुणही पुढे येऊ लागले आहेत. मात्र, या तरुणांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत.

खेड तालुक्यात महिला पोलीस पाटलांकडून अवैद्य दारू अड्डे उद्धवस्त
author img

By

Published : May 21, 2019, 10:29 PM IST

पुणे - खेड तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. आज (मंगळवार) मिरजेवाडी येथील दारू भट्टीवर महिला पोलीस पाटलांनी नागरिकांच्या मदतीने अवैद्य दारू भट्टी उध्वस्त करण्याबरोबरच संपूर्ण झोपडीही उद्धवस्त केली आहे.

खेड तालुक्यात महिला पोलीस पाटलांकडून अवैद्य दारू अड्डे उद्धवस्त

चास येथे ४ दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने महिलांनी एकत्र येऊन गावातील २ अवैद्य दारू अड्डे उध्वस्त केले होते. त्यावेळी दारूभट्टी चालवणाऱ्या महिलांनी संपूर्ण गाव संपवणार अशी धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चास गावातील सर्व दारू धंद्यावर छापा टाकून गुन्हे दाखल केले होते. मात्र, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दारू अड्डे उद्धवस्त करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता.

वर्षापूर्वी चास, कडुस परिसरात दारू बंदी करण्यासाठी महिलांनी मोठे आंदोलन केले होते. दोन्ही गावात दारुबंदी केली. मात्र, एकाच वर्षात या गावांमध्ये पुन्हा दारू अड्डे उभे राहिले. मात्र, महिलांनी पुन्हा दारू अड्डे उद्धवस्त करायला सुरुवात केली आहे. दारू बंदी असताना अवैद्य दारू विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी तरुणही पुढे येऊ लागले आहेत. मात्र, या तरुणांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Intro:Anc__खेड तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये अवैद्य दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत असताना आता महिला रणरागिणींनी मी कंबर कसून दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे आज मिरजेवाडी येथील दारू भट्टीवर महिला पोलीस पाटलांनी नागरिकांच्या मदतीने रणरागिनी बनवून अवैद्य दारूभट्टी उध्वस्त केली त्यानंतर पोलीसांनी संपुर्ण झोपडी उद्धवस्त केली.

चार दिवसांपूर्वी चास येथे अशाच पद्धतीने महिलांनी एकत्र येऊन गावातील दोन अवैद्य दारू अड्डे उध्वस्त केले होते त्यावेळी दारूभट्टी चालवणाऱ्या महिलांनी संपूर्ण गाव संपवणार अशी धमकी दिली होती त्यानंतर पोलिसांनी चास गावातील सर्व दारू धंद्यावर छापा टाकून गुन्हे दाखल केले होते मात्र आज मध्यरात्रीच्या सुमारास दारुअड्डे उद्धवस्त करण्यासाठी असणा-या एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला आहे

चास,कडुस परिसरात दारुबंदी करण्यासाठी महिलांनी मोठं आंदोलन उभारुन दारुबंदी या दोन्ही गावांत दारुबंदी केली मात्र एकाच वर्षात या गावांमध्ये पुन्हा गावांमध्ये दारुअड्डे उभे राहिले हि महिलांची हार होती मात्र आपला संसार डोळ्यासमोर उद्धवस्त होत असताना आता या महिलांनी रौद्र्य रुप धारण करुन दारुअड्डे उद्धवस्त करायला सुरवात केली आहे..

दारुबंदी असताना अवैद्य दारु विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी तरुणही पुढे येऊ लागले आहे मात्र या तरुणांना लक्ष करुन प्राणघातक हल्ले केले जात असतील तर पोलीस यंत्रणा काय करते असाही प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे.Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.