ETV Bharat / state

पुणे : खेड पंचायत समिती सभापतींनी केला महिला सदस्यांवर जीवघेणा हल्ला - Khed Panchayat Samiti news

शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील डोंणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्टमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Khed Panchayat Samiti news
पुणे : खेड पंचायत समिती सभापतींनी केला महिला सदस्यांवर जीवघेणा हल्ला
author img

By

Published : May 27, 2021, 4:21 PM IST

Updated : May 27, 2021, 4:58 PM IST

पुणे - खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील डोंणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्टमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणूकीवरून वाद -

पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणूकीवरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते म्हणून समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्या ठरावाच्या बाजूने येत्या 31 तारखेला मतदान होणार होते. त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्टमध्ये थांबले होते. मात्र, ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री त्यांचा भाऊ आणि कार्यकर्त्यांसोबत येऊन या सदस्यांवर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे खेडचे राजकीय वातावरण तापले आहे.

हेही वाचा - पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस मंत्र्यांची विधानभवनात बैठक

Last Updated : May 27, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.