पुणे - शहरातील धरण क्षेत्रात २-३ दिवस मुसळधार पाऊस ( Heavy rains in Pune ) पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. गेल्या २४ तासात ०.७९ टीएमसी पाणीसाठा धरणात वाढला असून, एकूण पाणीसाठा ८.६८ टीएमसी इतका झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या धरणांतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. आज सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा पावणेसात टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
२४ तासांत आणखी ०.८१ टीएमसी पाणीसाठा वाढला - प्रकल्पातील एकूण पाणीसाठा काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४.४५ टीएमसी इतका होता. त्यात गेल्या २४ तासांत आणखी ०.८१ टीएमसीची भर पडून तो आता ०.६७ टीएमसी इतका झाला आहे. खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर ही चार धरणे येतात. या सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. वरसगाव साठवण क्षमता १२.८२ टीएमसी, पानशेत धरणाची एकूण साठवण क्षमता १०.६५ टीएमसी, टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७१ टीएमसी तर, खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता १.९७ टीएमसी इतका आहे.
५.४५ एवढा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध - प्रकल्पातील एकूण पाणीसाठा हा २ जुलै २०२२ ला २.५१ टीएमसी इतका कमी झाला होता. मात्र ३ जुलैपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने, दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. .खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा हा मागील आठ वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच खूप कमी झाला होता. खडकवासला धरणामध्ये ०.७९, पानशेत २.२७, वरसगाव २.१४, टेमघर ०.२५, असा एकूण ५.४५ एवढा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी याच तारखेचा ८.६८ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.
दरम्यान पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू ( Heavy Rain In Pune ) आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला ( Warning of heavy rains in Pune ) आहे. पुणे जिल्हा प्रशसनाच्यावतीने जिल्ह्यातील जी धोकादायक गावे, वस्ती आहेत. अश्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य खबरदारी घेतली आहे. लोकांना रस्ते, आरोग्य, अन्नधान्य, वीज या सर्व सुविधा तसेच गावांमध्ये वॉकी टॉकी देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासन सज्ज - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्ह्यात माळीन सारखी कोणतीही घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ज्या ज्या गावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या गावांमध्ये सर्वेक्षण करून त्या त्या वस्तीतील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर काही गावांमध्ये रस्ते, अन्नधान्य, औषध उपचार तसेच संपर्क तुटू नये म्हणून वॉकी टॉकी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जर पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये जरी अतिवृष्टी झाली तरी या परिस्थितीत जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.