ETV Bharat / state

Mukta Tilak Passes Away : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन

भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन (Mukta Tilak Passes Away) झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार (BJP MLA Mukta Tilak Death) सुरू होते. आज दुपारी टिळक यांनी अखेरचा श्वास (MLA Mukta Tilak Funeral) घेतला.

Mukta Tilak
मुक्ता टिळक
author img

By

Published : Dec 22, 2022, 4:21 PM IST

Updated : Dec 22, 2022, 7:15 PM IST

पुणे : कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे अल्पशा आजाराने निधन (Mukta Tilak Passes Away in pune) झाले आहे. गेल्याकाही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू (BJP MLa Mukta Tilak Death) होते. आज दुपारी टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेर आज वयाच्या 57 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दु.3.30 वा दुखःद निधन झाले. उद्या सकाळी अंत्यदर्शनसाठी 9.00 ते 11.00 केसरी वाडा राहत्याघरी ठेवण्यात येईल. उद्या सकाळी 11 वाजेनंतर वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार (BJP MLa Mukta Tilak Death Pune) आहेत. गेल्या पाच वर्षापासून त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. त्यांच्या पाश्यात पती,मुलगी,मुलगा,जावई असा त्यांचा परिवार आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन

भाजपाच्या पहिल्या महापौर - टिळक हे भारतीय जनता पक्षाकडून 4 वेळा नगरसेवक, एकदा महापौर आणि सध्या ते आमदार म्हणून कार्यरत होत्या. मुक्ता टिळक यांना टिळक घराण्यातील पहिल्या महापौर होण्याचा मान मिळाला होता. पुण्यात 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महापालिकेच्या इतिहासात भाजपाची प्रथमच सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला होता. त्यांनी 2019 मध्ये कसबा विधानसभा (kasba constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या.

आमदार मुक्ता टिळक यांचा अल्पपरिचय - मुक्ता टिळक यांनी 2002 साली पहिली निवडणूक लढवली होती. 2002 पासून त्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या आता आमदार झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीमध्ये त्या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला होता. सर्वाधिक मतांनी निवडून आल्यानंतर त्यांचा मोठा गौरवही करण्यात आला होता. पुण्याच्या राजकारणात आल्यापासून त्यांनी महापौर पद आणि स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते. मुक्ता टिळक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली होती. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केले होते त्यानंतर त्यांनी एमबीएही केले होते.

Last Updated : Dec 22, 2022, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.