ETV Bharat / state

Kasaba By Election : भाजपच्या नेत्यांकडून कसब्यात पैसे वाटप.. रवींद्र धंगेकर आज करणार उपोषण..

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी पाच वाजता संपला. या दरम्यान त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजप नेते पैसे वाटप करत असल्याचे रवींद्र धंगेकरांनी म्हटले.

Kasaba By Election
रवींद्र धंगेकर आज करणार उपोषण
author img

By

Published : Feb 25, 2023, 8:58 AM IST

रवींद्र धंगेकर आज करणार उपोषण

पुणे : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला आहे. तरीही कसबा मतदार संघातील आरोप प्रत्यारोप काही संपताना पहायला मिळत नाहीयेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गंभीर आरोप केले. पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे नेते मंडळी हे पैसे वाटप करत होते, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आता याविरोधात ते कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार आहे.

रवींद्र धंगेकर उपोषणाला बसणार : शुक्रवारी पाच वाजता प्रचार संपला तरी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात होता. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करत आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना मतदार संघ सोडून गावाला जायची दमदाटी करत असल्याचे आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण : या विरोधात ते पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार आहे. या उपोषणात त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित असणार आहेत. काल कसबा पोटनिवणुकीचा संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपला दोन्ही उमेदवारांकडून सर्वच आजी माजी नेतेमंडळींकडून सभा, रोड शो करण्यात आला. तसेच या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले. भारतीय जनता पक्षाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. तेथे ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते देखील या निवडणुकीत एकत्र असल्याचे दिसून येत आहे.

विजयी होणार, पूर्ण विश्वास : भाजप नेत्या आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. शुक्रवारी रवींद्र धंगेकर यांच्या रॅलीत स्थानिक पदाधिकारी दिसून आले तर दुसरीकडे आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हे मैदानात उतरले होते. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली होती. यंदा कसब्यात परिवर्तन होणार आहे, जनता मला येत्या 26 तारखेला मतदान करून विजयी करणार असा मला पूर्ण विश्वास आहे असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा :Arvind Kejriwal met Uddhav Thackeray : अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाले, शेर का बेटा शेर होता है!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.