ETV Bharat / state

Kalicharan Maharaj On Udayanidhi Stalin: उदयनिधी स्टॅलिनवर भडकले कालीचरण महाराज, असभ्य शब्दात केली टीका

Kalicharan Maharaj On Udayanidhi Stalin: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असणारे कालीचरण महाराज यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केलंय. तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा तसंच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून देशभरातून गदारोळ झाला होता. या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर शब्दात कालीचरण महाराज यांनी निषेध व्यक्त करत हिंदूंना जागं होण्याचं आवाहन केलंय.

Kalicharan Maharaj On Udayanidhi Stalin
कालीचरण महाराज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 9:37 PM IST

Updated : Sep 6, 2023, 9:45 PM IST

कालीचरण महाराजांनी साधला माध्यमांशी संवाद

पुणे Kalicharan Maharaj On Udayanidhi Stalin: उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या सनातन विरोधी वक्तव्यावर संतापलेले कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी आज वादग्रस्त, असभ्य शब्द वापरले. कालीचरण यांनी म्हटलंय की, हिंदू सनातन धर्माचा निषेध करणारे डुकरांचे पिल्लू जातीवादात अडकले आहेत. व्होटबँकेच्या लोभामध्ये अडकले आहेत. आपलं जग, परलोक आणि भावी पिढी सुधारायची असेल, तर सर्व हिंदूंचे हिंदुत्ववादी व्होट बँकेत रूपांतर झालं पाहिजे. धर्म रक्षेसाठी राजनीती अत्यंत आवश्यक असल्याची भावना देखील कालीचरण महाराज यांनी व्यक्त केलीय.

धर्म रक्षणासाठी राजकारण : हिंदूंमध्ये एकता नाही. ते सडक्या जातीवादात विभागले गेलेत. म्हणूनच इतर लोकांची हिंमत होते, ते हिंदुत्ववादावर बोलतात. हिंदुस्तानमध्येच खातात आणि त्याच ताटात छेद करण्याचं काम काहीजण करत आहेत, अशी टीका सनातनवर बोलणाऱ्या स्टालिनवर केलीय. त्यांना सत्तेत बसवणारे सडक्या जातीयवादात अडकलेले हिंदूच आहेत. ते टोमॅटो आणि पेट्रोलच्या भावात अडकले आहेत. जो स्पष्ट हिंदूवादी आहे, अशाच व्यक्तींना आपण मतदान करावं. तोच आपल्या हिंदुत्वाचं रक्षण करंल, असं आवाहनही कालीचरण यांनी केलंय. धर्म रक्षणासाठी राजकारण महत्त्वाचं आहे. हिंदू जागृत होत असल्यानं पुण्यश्वरासारखी प्रकरणे पुढे येतायत. इंडियाऐवजी भारत किंवा हिंदुस्थान असं भारताला नाव देण्यात यावं, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. यावेळी शरद पवार यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषेदेत बोलत होते. (Kalicharan Maharaj over hindu sanatan dharma)

इंडिया नको हिंदुस्थान म्हणा : पुढे कालीचरण महाराज म्हणाले की, 'इंडिया आणि भारत' या नावावरून सध्या जोरात चर्चा सुरूय. मला असं वाटतंय की, आपल्या देशाला सर्वांनी भारत म्हणावं किंवा हिंदुस्थान म्हणावं इंडिया म्हणू नये. हिंदुस्थान म्हणजे हिंदूंची स्थान त्यामुळं आपल्या देशाला हिंदुस्तान संबोधित करायला हवं, असं मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केलंय. (Kalicharan Maharaj)

हेही वाचा :

  1. Ayodhya Saint Jagatguru on Udhayanidhi: स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 'इतक्या' कोटींचे बक्षीस जाहीर-अयोध्येतील महाराजांकडून घोषणा
  2. Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : सनातन धर्म संपुष्टात आणलाच पाहिजे, मी माझ्या विधानावर ठाम - उदयनिधी स्टॅलिन
  3. Sanatana Dharma Remark Row: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर...स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Sep 6, 2023, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.