पुणे - गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेच्या सर्व यंत्रणा काम करत आहे. शिवाय खाजगी हॉस्पिटलमध्येही बेड्स उपलब्ध व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच जम्बो हॉस्पिटलबाबतचा करार 28 फेब्रुवारीला जरी संपला, तरी त्या हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा तशीच ठेवून भविष्यात गरज वाटल्यास जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करू शकतो, असे मत यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
आज तरी जम्बो हॉस्पिटलची गरज नाही -
पुणे शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील रुग्ण संख्या चौपटीने वाढू लागली आहे. अशीच रुग्ण संख्या वाढत गेली, तर नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु आज तरी जम्बो हॉस्पिटलची गरज नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या 15 दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ -
शहरात गेल्या 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणत रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात शहरात फक्त 1000 ते 1500 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या होती. मात्र आत्ता गेल्या 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दरोरोज 700 ते 800 रुग्ण शहरात सापडत असल्याने पुणे शहरात पून्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.