पुणे - शहरात सीएए,एनपीआर आणि एनसीआर कायद्याला विरोध करण्यासाठी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत गुजरातहून आलेले आमदार जिग्नेश मेवाणी यांनींही पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला.
मी गुजरातचा आहे. मात्र, त्या दोन्ही गुजरातींसोबत नाही, तर तुमच्या सोबत आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. आपण या लढाईत भारतीय म्हणून उतरलो, तरच जिंकू असे जिग्नेश मेवाणी यावेळी बोलताना म्हणाले. जातीधर्मांची लेबल लावून लढलो तर कदापिही यश येणार नाही. निवडणूक लढवण्यासाठी मुद्दा नसल्याने अमित शहा यांच्याकडून दिल्लीतील शाहिनबागचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गांधी पुण्यतिथीच्या दिवशीच दिल्लीत आणखी एक गोडसे तयार होत आहे, हे या देशाचे दुर्दैव आहे. ही लढाई भाजप विरूद्ध १३० कोटी भारतीयांची आहे, असे मेवाणी म्हणाले.
मोदी तुम्ही चारित्र्यहीन आहात म्हणूनच पोलिसांना एका महिलेच्या हॉटेलपर्यंत पोचवलं, अशी जहरी टीका मेवानी यांनी केली. मोदी हे बिकाऊ आहेत, ते चारित्र्यहीन आहेत, हे मी आज पुण्याच्या व्यासपीठावरून छातीठोकपणे सांगतो, अशा शब्दांत जिग्नेश मेवाणी यांनी मोंदीवर हल्लाबोल केला.