ETV Bharat / state

इंदापूरच्या जागेसाठी जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला

शिवस्वराज्य यात्रेला उपस्थितांमध्ये इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडेच राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा घुमू लागल्या तेव्हा पाटील म्हणाले की, राजकारणात डोके शांत ठेवून निर्णय घ्यावे लागतात. आपल्याला आघाडीचा धर्म पाळायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून जो निर्णय होईल, त्यानुसार काम करावे लागेल.

जयंत पाटील
author img

By

Published : Aug 27, 2019, 10:55 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे दाखल झाली. यावेळी झालेल्या सभेत पक्षातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडे घ्या, अशा घोषणा दिल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला. ही शिवस्वराज्य यात्रा कोणाला विरोध म्हणून नव्हे तर भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राचे काय करुन ठेवले आहे, हे सांगण्यासाठी आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना जयंत पाटील

शिवस्वराज्य यात्रेला उपस्थितांमध्ये इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडेच राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा घुमू लागल्या, तेव्हा पाटील म्हणाले की, राजकारणात डोके शांत ठेवून निर्णय घ्यावे लागतात. आपल्याला आघाडीचा धर्म पाळायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून जो निर्णय होईल, त्यानुसार काम करावे लागेल, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे इंदापूरच्या जागेबाबत सबुरीचा सल्ला दिला. अजित पवारांवर गुन्हा दाखल झाला पण त्यामध्ये भाजपसह अन्य पक्षांतील मंडळींचा समावेश आहे. मात्र, प्रसारमाध्यमे अजित पवार यांच्याच नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा करीत आहेत. या संदर्भातील वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे,असे पाटील म्हणाले.

भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Intro:इंदापूर च्या जागेवरून सबुरीने घ्या जयंत पाटील यांचा कार्यकर्त्याना सल्लाBody:mh_pun_01_ncp_on_indapur_avb_7201348

anchor
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे दाखल झाली यावेळी झालेल्या सभेत पक्षातील स्थानिक नेते आणि करीकर्त्यांनी इंदापूर ची जागा राष्ट्रवादी कडे घ्या अशा घोषणा दिल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय ही
शिवस्वराज्य यात्रा कोणाला विरोध म्हणून नव्हे तर भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे असे जयंत पाटील म्हणाले, शिवस्वराज्य यात्रेला उपस्थितांमध्ये इंदापूर ची जागा राष्ट्रवादीकडेच राहिली पाहिजे, अशा प्रकारच्या घोषणा घुमू लागल्या तेव्हा पाटील म्हणाले की राजकारणात डोके शांत ठेवून निर्णय घ्यावे लागतात.
आपल्याला आघाडीचा धर्म पाळायचा आहे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून जो निर्णय होईल त्यानुसार काम करावे लागेल. असे सांगून त्यांनी अप्रत्यक्ष पणे इंदापूरच्या जागेबाबत सबुरीचा सल्ला दिला अजित पवारांवर गुन्हा दाखल झाला पण त्यामध्ये भाजपसह अन्य पक्षांतील मंडळींचा समावेश आहे मात्र प्रसारमाध्यमे अजित पवार यांच्याच नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा करीत आहेत या संदर्भातील वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे असे पाटील म्हणाले.
भाजपच्या महाजानदेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
byte जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.