ETV Bharat / state

Jammu Kashmir Farmer Pune Visit : जम्मू काश्मीरमधील शेतकरी पुणे दौऱ्यावर; जम्मूत दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणार - जम्मू काश्मीर शेतकरी पुणे दौऱ्यावर

देशात आणि विविध राज्यातील गायींविषयक माहिती घेऊन दुध व्यवसायात पूढे जाण्यासाठी जम्मू काश्मीर येथील काही शेतकरी हे पुणे दौऱ्यावर आले आहे. त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालय आणि पशुसंवर्धन विभाग येथे भेट देऊन माहिती घेतली. ( Jammu Kashmir's Farmer on Pune Visit )

Jammu Kashmir Farmer Pune Visit
जम्मू काश्मीरमधील शेतकरी पुणे दौऱ्यावर
author img

By

Published : Jan 4, 2022, 9:35 AM IST

Updated : Jan 4, 2022, 10:28 AM IST

पुणे - जम्मू-काश्मिरची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि संबंधित कामांवर अवलंबून होती. राज्याच्या आर्थिक विकासात फळबागांचा वाटा महत्वाचा होता. यात सफरचंद, जर्दाळू, चेरी, नाशपाती, मनुका, बदाम आणि अक्रोड समाविष्ट आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात या शेतकऱ्यांना दुधाविषयक आणि गायीबद्दल माहिती नसल्याने येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. देशात आणि विविध राज्यातील गायींविषयक माहिती घेऊन दुध व्यवसायात पूढे जाण्यासाठी जम्मू काश्मीर येथील काही शेतकरी हे पुणे दौऱ्यावर आले आहे. त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालय आणि पशुसंवर्धन विभाग येथे भेट देऊन माहिती घेतली. ( Jammu Kashmir's Farmer on Pune Visit )

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने जम्मू काश्मिरमधील शेतकऱ्यांशी साधलेला संवाद

पुण्यातील आम्ही पुणेकर संस्थेच्यावतीने जम्मू काश्मीरमधील काही शेतकरी हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात हे शेतकरी पशुसंवर्धन तसेच गायी विषयक अधिक माहिती घेणार आहेत. कारण जम्मू-काश्मीर येथे ज्या गायी असतात त्या गायीपासून दुधाचे प्रमाण हे खूप कमी आहे. यात सुधारणा कशी करता येईल, यासाठी हे शेतकरी पुण्यात आले आहे. आज या शेतकऱ्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालय तसेच पशुसंवर्धन विभाग येथे भेट देऊन या परिसरातील पाहणी केली.

Jammu Kashmir's Farmer on Pune Visit
जम्मू काश्मीरमधील शेतकरी पुणे दौऱ्यावर

देशी गाईबद्दल माहिती घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न -

जम्मू काश्मीर येथे प्रामुख्याने तेथील गाई आणि डोंगराळ भागात देखील ज्या गाई वापरल्या जातात त्यापासून 2 लिटर दुध मिळते. यातून बेरोजगारीही कमी होत नाही आहे. त्यामुळे पुण्यात येऊन गाई आणि त्यांच्याविषयी माहिती घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात दुग्ध व्यवसायात पूढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. यात आम्ही गिर, साहिवाल, राठी अशा गाईंबद्दल माहिती घेतली. तसेच राज्यातील ज्या गाई ज्यांची आज देशभरात एक वेगळीच ओळख आहे अशा खिलार गाई, डांगी, देव कल्लारी, अशा गाईंबद्दल माहिती घेतली आहे. आम्ही आमच्या इथे दुग्ध व्यवसायात तसेच पशुपालन वाढवणार आहे, असे यावेळी या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - Sameer Wankhede Transferred : अखेर समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली

दुध व्यवसाय जम्मू-काश्मीरमध्ये वाढवण्यासाठी करणार प्रयत्न -

आज आपल्याला रोज 300 मिली दुधाची गरज आहे आणि वाढत्या लोकसंख्यामुळे दुधाचे प्रमाण वाढवले पाहिजे. आज आपल्या देशामध्ये 45 टक्के गाईंपासून आणि 55 टक्के म्हशींपासून दूध मिळते. गाईच्या एक लीटर दुधामध्ये 600 किलो कॅलरी आणि म्हशीच्या एक लीटर दुधापासून 1000 किलो कॅलरी मिळतात. आज दुधापासून अनेक पदार्थ बनत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. आज आपल्या देशामध्ये 60% लोक शेती करत आहेत आणि जवळ जवळ 72% लोक हे खेड्यामध्ये राहत आहेत. 7 कोटी शेती परिवारामध्ये प्रत्येकी दोन ग्रामीण घरामध्ये दुधाचा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय जम्मूत वाढला पाहिजे, यासाठी हे शेतकरी प्रयत्न करणार आहे.

कृषी कायदे झाले असते तर ते खूप फायदेशीर ठरले असते -

नुकतेच केंद्र सरकारच्या वतीने तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत या शेतकऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, तिन्ही कृषी कायद्यांबाबत शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी आपल्या फायद्यासाठी आंदोलन केले. अन्यथा जर हे कायदे झाले असते तर ते खूप फायदेशीर ठरले असते. या सरकारची कामगिरी देखील खूपच चांगली असल्याचे, यावेळी या शेतकऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Jan 4, 2022, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.