पुणे - भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात झालेल्या भाजप पदाधिकारी बैठकीत मुळीक यांचे नाव जाहीर केले.
बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे शहर भापजच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली. या पदाचा वापर करत सर्वसामान्य पुणेकरांना न्याय मिळवून देण्याचे काम करू असे नवनिर्वाचित शहराध्यक्षांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये तीन गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसे हस्तगत; तीन जणांना केले जेरबंद
पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम करणार नाही आणि पक्षाच्या जबाबदारीला पूर्णपणे प्राधान्य देईल, असेही मुळीक यावेळी म्हणाले.
हेही वाचा - पुण्यात बंद सदनिकेत नग्नावस्थेत आढळला महिलेचा मृतदेह