पुणे: प्रा. पंडित या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी जेएनयू मधून पीएचडी पण केली आहे. त्यामुळे त्यांना ते विद्यापीठ चांगल्या पद्धतीने माहीत आहे. गेल्या काही वर्षात जेएनयूत वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे.ती आता निवळेल. तेथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी त्यांना साथ दिली तर त्या तेथे चांगला काळ आणू शकतात.
प्रा. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 3 दशक कार्यरत आहेत. आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. त्यांचा सर्वच भाषांवर प्रभाव आहे. त्यांनी विद्यापीठात मुलांना मराठी भाषेतही शिकवलेले आहे.राज्यशास्त्रात आंतरराष्ट्रीय राजकारण ही जी शाखा आहे त्यात देखील त्यांचा हातखंडा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांची विविध विद्यापीठात कुलगुरू म्हणून निवड झाली आहे. मात्र त्यांची एका राष्ट्रीय विद्यापीठाचे निवड झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी एक अभिमानाची बाब असल्याचे देखील यावेळी प्राध्यापक मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.