ETV Bharat / state

डॉक्टर, आयटी इंजिनिअर दररोज दीड हजार लोकांना करत आहेत अन्नदान - food for poor peoples

उजैन येथील बाबा जय गुरुदेव धर्म विकास संस्था ही २३ मार्च पासून अविरतपणे अन्नदान करत आहे.

help
डॉक्टर, आयटी इंजिनिअर दररोज दीड हजार लोकांना करत आहेत अन्नदान
author img

By

Published : Apr 27, 2020, 7:23 AM IST

पुणे - जगभरात कोरोना विषाणू पसरला असून यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर, लॉकडाऊनमध्ये हातातोंडाशी असलेली रोजीरोटी गेली आहे. यामुळे एक वेळचे अन्न लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्तींना मिळत नाही. हे सर्व पाहता अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत अन्न पोहचवत आहेत. बाबा जय गुरुदेव धर्म विकास संस्था उजैन ही संस्थादेखील मार्च महिन्यापासून गरजू व्यक्तींना अन्नदान (जेवण) करत आहेत. दररोज तब्बल १ हजार ते पंधराशे व्यक्तींपर्यंत अन्न पोहचवत असून संस्थेमार्फतच जेवण तयार केलं जाते, अशी माहिती डॉ. युवराज कदम यांनी दिलीय. शहरात कार्यरत असलेल्या या संस्थेमध्ये बहुतांश उच्चशिक्षित नागरिक असून आयटी इंजिनिअर, डॉक्टर तसेच इतर क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. परंतु, लॉकडाऊन झालं आणि येथील काही कामगार बेरोजगार झाले. त्यात जिल्हा ओलांडण्यास बंदी असल्याने मूळ गावी जाता येत नाही, त्यामुळे एक वेळच्या जेवणाची भ्रांत झाली. तसेच हाल इतर व्यक्तींचे देखील असून त्यांचे देखील अन्ना विना हाल होत आहेत. अश्या वेळी अनेक संस्थांनी अन्नदानाच पुण्याचं काम सुरू केलेले आहे. उजैन येथील बाबा जय गुरुदेव धर्म विकास संस्था ही २३ मार्च पासून अविरतपणे अन्नदान करत आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात ही संस्था केवळ गरजू व्यक्तींना अन्नदान करते. शिवाय, यांनी महानगरपालिका आणि व्हाट्सऍपवर आपला मदतीचा नंबर व्हायरल केला असून त्यामार्फत देखील अन्नदान करत आहेत. पिंपरी, चिंचवड, रावेत, डांगे चौक, देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वरून जाऊन त्या ठिकाणच्या व्यक्तीला अन्न दिलं जात आहे. दिवसात तब्बल १ हजार ते १५०० व्यक्तींना जेवण दिले जात आहे. ते करत असलेले कार्य खरच खूप कौतुकास्पद असून अश्या अनेक संस्थांची गरज आहे हे नक्की.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.