ETV Bharat / state

'IPS कृष्ण प्रकाश यांनी 200 कोटींची वसुली केली?' पोलीस अधिकाऱ्याचे पत्र व्हायरल - Krishna Prakash

पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Krishna Prakash ) यांचा उल्लेख असलेल्या एका लेटरमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. यात 200 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा दावा लेटरमध्ये करण्यात आला आहे. अशोक डोंगरे यांच्या नावाचा वापर करण्यात आलाय. या प्रकरणी एपीआय अशोक डोंगरे यांनी मी अर्ज केला नाही असे म्हटलेय, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IPS Krishna Prakash
कृष्ण प्रकाश
author img

By

Published : May 6, 2022, 6:25 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Krishna Prakash ) यांचा उल्लेख असलेल्या एका लेटरमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. यात 200 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा दावा लेटरमध्ये करण्यात आला आहे. अशोक डोंगरे यांच्या नावाचा वापर करण्यात आलाय. या प्रकरणी एपीआय अशोक डोंगरे यांनी मी अर्ज केला नाही असे म्हटलेय, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या पत्रातील मजकूर -

आत्तापर्यंत 200 करोड रुपये पेक्षा जास्त रक्कम गोळा - अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्रात म्हटले आहे की, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारी करोडो रुपये मला स्वीकारण्यास सांगितली. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा केलेली रक्कम 200 करोड रुपये पेक्षा जास्त आहे.

माझ्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता - कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. पण पदाने कनिष्ठ असल्याने सगळे करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको, ती काम करावी लागली. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो, याची दाट शक्यता आहे.

आतापर्यंतच्या व्यवहाराची पुराव्यानिशी माहिती - सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाण घेवाणीची पुराव्यानिशी माहिती आहे.

चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते. ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत. या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाकडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको, असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते.

आतापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे. यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वयक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळे मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास मिळालेला नाही. त्यामुळे आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही, असे सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबदार ठाम आहे.

असा मजकूर असलेले एक पत्र व्हायरल झाले आहे. मात्र त्या अधिकाऱ्याने आपण असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही, असा दावा केलेले आहे.

हेही वाचा - PMC Election 2022 : पुणे महानगरपालिका निवडणुकीत कसं असेल ओबीसी आरक्षणाचं गणित? जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.