ETV Bharat / state

Road Accident Expert Tanmay Pendse : नवले ब्रिजवर सतत का होतात अपघात ? वाचा, रस्ते अपघात अभ्यासक तन्मय पेंडसे यांची खास मुलाखत - रस्ते अपघात अभ्यासक तन्मय पेंडसे

पुण्यातील सर्वात धोकादायक असलेला नवले ब्रिज आणि त्यावर होणारे सतत अपघात हे आता पुणेकरांना नवीन (Tanmay Pendse on accidents on Navle Bridge Pune) नाही. परंतु हे अपघात का होतात ? त्या ठिकाणी नेमके काय झालेले आहे, आणि काय करायला पाहिजे ? याविषयी रस्ते अपघात अभ्यासक तन्मय पेंडसे यांच्याशी बातचीत केले ईटीव्ही प्रतिनिधींनी संवाद (interview with road accident expert Tanmay Pendse) साधला.

Road Accident Expert Tanmay Pendse
नवले ब्रिजवर अपघात
author img

By

Published : Nov 22, 2022, 10:39 AM IST

पुणे : पुण्यातील सर्वात धोकादायक असलेला नवले ब्रिज आणि त्यावर होणारे सतत अपघात हे आता पुणेकरांना नवीन (Tanmay Pendse on accidents on Navle Bridge Pune) नाही. सुदैवाने काल झालेल्या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. परंतु हे अपघात का होतात ? त्या ठिकाणी नेमके काय झालेले आहे, आणि काय करायला पाहिजे ? याविषयी रस्ते अपघात अभ्यासक तन्मय पेंडसे यांच्याशी बातचीत केले ईटीव्ही प्रतिनिधींनी संवाद (interview with road accident expert Tanmay Pendse) साधला.

अतिशय तीव्र उतार : कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत अतिशय तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग वाढतो. वेग वाढल्यानंतर अवजड वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे अनेक नवले पुलाचा उतार आणि वडगाव पुलावर जाताना असणारा चढ तसेच विश्वास हॉटेल समोर असणारे पंचर अतिशय धोकादायक ठरत आहेत.

रस्ते अपघात अभ्यासक तन्मय पेंडसे यांची खास मुलाखत

अतिक्रमण व बेशिस्त वाहनचालक : दरम्यान, सेवा रस्त्यावर दुतर्फा असणारे अतिक्रमण व बेशिस्त वाहनचालक हे प्रामुख्याने अपघाताला जबाबदार आहेत. सेवा रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्या, दुकाने, पार्किंग, तसेच मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज देखील उभारण्यात आली आहे. तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी पंक्चर असल्याने अनेक वाहन चालक उलट्या दिशेने ये-जा करत असतात. यामुळे देखील अपघात वाढताना दिसत (accidents on Navle Bridge Pune) आहे.

चालकांच्या मानसिकतेतील संघर्ष : या अपघातांची पद्धत सारखीच आहे. विशेषतः जड वाहनांचे नियंत्रण सूटूनच हे अपघात झाले आहेत. चार चाकी वाहनांचे अपघात या ठिकाणी तुलनेने कमी आहेत. दुसरीकडे महामार्गावर वाहन चालवणारे चालक आणि शहरातून महामार्गावर येणारे चालक यांच्या मानसिकतेत मोठा फरक दिसतो. त्यामुळे हे दोन्ही चालक जेव्हा एकत्र येतात. तेव्हा दोघांच्या मानसिकतेतील संघर्ष, हे अपघाताचे एक कारण असल्याचे निरीक्षण रस्ते अपघात तज्ञ तन्मय पेंडसे यांनी नोंदविले आहे.

रमलर स्ट्रीप : हे अपघात रोखायचे असतील, तर तीव्र उताराच्या आधी एक किलोमीटरपासून 'रमलर स्ट्रीप' लावायला हवेत. बऱ्याचदा रमलर स्ट्रीप हे तुमचे स्पीड कमी करण्यासाठी वापरतात, असा समज असतो. परंतु हे तुम्हाला सतर्क ठेवण्यासाठी वापरले जातात. 1 किलोमीटरच्या अंतरात हे रमलर स्ट्रीप लावले तर उतारावरून येणाऱ्या वाहनांचा वेग आपोआपच कमी होईल. असा उपाय पेंडसे (Road Accident Expert Tanmay Pendse) यांनी सुचवला आहे.

सरकारने उपाय करणे गरजेचे : तन्मय पेंडसे हे गेले दहा वर्ष रस्ते अपघातावर काम करत असून त्यांच्या कुटुंबातील त्यांचा भाऊ आणि पुतण्या अपघातात गेल्यामुळे त्यांनी हे काम करणे सुरू केले. नॅशनल हायवेवरती ज्या काही अपघाताच्या समस्या आहेत. त्यावर तिथे सातत्याने केंद्र सरकार राज्य सरकार आणि त्याचे अधिकारी मंत्री यांना भेटून या सगळ्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास पाहता तीव्र उतार कमी करणे गरजेचे असल्यास सध्या तरी दिसत आहे. हायवे अथॉरिटी असे म्हणते की, हा जो उतार आहे तो योग्य आहे. आता सरकार समोर कोण बोलणार ? अशी अवस्था असताना यात सर्वसामान्याचे जीव जाऊ नये, हिच सर्व सामान्य लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर सरकारने उपाय करणे गरजेचे (Navle Bridge Pune) आहे.

अपघात : नेहमी अपघात होणारे कात्रज नवीन बोगदा ते वडगाव पूल हे अंतर चार किलोमीटर आहे. २०१४-२०२२मधील मृत्यू आणि जखमी पुढीलप्रमाणे मृत्यू-६५, जखमी-१४, अपघात-१८५, वाहनांचा नुकसान-100, ब्लॅक स्पॉट 7.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.