ETV Bharat / state

आयएनएस शिवाजीची दैदिप्यमान 75 वर्षे.. - east india company

आयएनएस शिवाजीला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेमध्ये भारतीय नौदल तटरक्षक दल आणि सुमारे 20 देशांच्या नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आयएनएस शिवाजीची दैदिप्यमान 75 वर्षे..
author img

By

Published : May 12, 2019, 10:41 PM IST

पुणे - देशाच्या समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या नौका आणि तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे कार्यान्वन करण्यात आयएनएस शिवाजी या ऐतिहासिक प्रशिक्षण केंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा आयएनएस शिवाजीला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

आयएनएस शिवाजीची दैदिप्यमान 75 वर्षे..

एखाद्या राष्ट्रावर शत्रुकडून सागरी सीमाद्वारे आक्रमण केले जाऊ शकते, ही शक्यता गृहित धरून शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सागरी सुरक्षेला प्राथमिकता दिली होती. शिवाजी महाराजांच्या सागरी सुरक्षेच्या धोरणांचा अवलंब भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने केला आहे. त्याचे अनेक दाखले आजही उपलब्ध असून, कर्मसु कौशलम् हे ब्रीदवाक्य असलेल्या आयएनएस शिवाजी ही सागरी सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्थांच्या श्रेणीतील एक महत्त्वाची संस्था आहे.

कारण सागरी सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या नौका आणि आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करण्याबरोबरच त्यांचा कुशलतेने वापरणे ही तितकेच गरजेचे असते. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची ही खूप आवश्यकता असते. ब्रिटिशांना ही गोष्ट चांगली अवगत होती. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या रॉयल नेव्हीने भारतीय उपखंडातील समुद्री सीमांच्या संरक्षणासाठी सुरुवातीला ब्रिटनमध्ये आणि नंतर मुंबईमध्ये एका प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या एका विमानाला लोणावळ्यामध्ये अपघात झाला होता. त्या अपघाताचा तपास करताना सह्याद्रीच्या कुशीत ब्रिटिशांना लोणावळ्यातील एका महत्त्वाचा जागेचा शोध लागला होता. त्यामुळे त्यांनी मुंबईतील प्रशिक्षण केंद्र पुढच्या २ वर्षात थेट लोणावळ्यात हलवले होते. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी आयएनएस शिवाजीची निर्मिती करताना शिवाजी महाराजांच्या धोरणांचा स्वीकार केला आणि या प्रशिक्षण केंद्राचे नामकरण ही शिवाजी महाराजांच्या नावाने केले होते. त्यामुळे कुठल्याही भारतीय शासकाला अशाप्रकारे ब्रिटिशांनी गौरव होण्याची ही इतिहासातली पहिली आणि एकमेव घटना असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

आयएनएस शिवाजीला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेमध्ये भारतीय नौदल तटरक्षक दल आणि सुमारे 20 देशांच्या नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये आण्विक, रासायनिक, जैविक हल्ल्यापासून संरक्षण करणे, मरीन इंजिनिअरिंग, नौदलाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही जहाजावर काम करण्यापूर्वी आवश्यक असलेले प्रशिक्षण, बेसिक कंप्यूटर एप्लीकेशन, डिझेल आणि गॅसवर चालणाऱ्या टरबाइनच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाबरोबरच आयएनएस शिवाजीने अगदी वाफेवर चालणाऱ्या जहाजांच्या इंजिनपासून ते आधुनिक काळातील सागरी सुरक्षा प्रणालीच्या कार्यान्वनाचे प्रशिक्षण देण्याची क्षमता ही विकसित केली आहे. हे यश भारताच्या सामरिक आणि संरक्षण क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे.

Intro:पुणे - देशाच्या समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या नौका आणि तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे कार्यान्वन करण्यात आयएनएस शिवाजी या ऐतिहासिक प्रशिक्षण केंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा आयएनएस शिवाजीला 75 वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.Body:एखाद्या राष्ट्रावर शत्रुकडून सागरी सीमाद्वारे आक्रमण केले जाऊ शकते, ही शक्यता गृहित धरून शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सागरी सुरक्षेला प्राथमिकता दिली होती. शिवाजी महाराजांच्या सागरी सुरक्षेच्या धोरणांचा अवलंब भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने केला आहे. त्याचे अनेक दाखले आजही उपलब्ध असून, कर्मसु कौशलम् हे ब्रीदवाक्य असलेल्या आयएनएस शिवाजी ही सागरी सुरक्षेसाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्थांच्या श्रेणीतील एक महत्त्वाची संस्था आहे.

कारण सागरी सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या नौका आणि आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करण्याबरोबरच त्यांचा कुशलतेने वापरणे ही तितकेच गरजेचे असते. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची ही खूप आवश्यकता असते.

ब्रिटिशांना ही गोष्ट चांगली अवगत होती. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या रॉयल नेव्हीने भारतीय उपखंडातील समुद्री सीमांच्या संरक्षणासाठी सुरुवातीला ब्रिटनमध्ये आणि नंतर मुंबईमध्ये एका प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या एका विमानाला लोणावळ्यामध्ये अपघात झाला होता. त्या अपघाताचा तपास करताना सह्याद्रीच्या कुशीत ब्रिटिशांना लोणावळ्यातील एका महत्त्वाचा जागेचा शोध लागला होता. त्यामुळे त्यांनी मुंबईतील प्रशिक्षण केंद्र पुढच्या 2 वर्षात थेट लोणावळ्यात हलवले होते. विशेष म्हणजे ब्रिटिशांनी आयएनएस शिवाजीची निर्मिती करताना शिवाजी महाराजांच्या धोरणांचा स्वीकार केला आणि या प्रशिक्षण केंद्राचे नामकरण ही शिवाजी महाराजांच्या नावाने केले होते. त्यामुळे कुठल्याही भारतीय शासकाला अशाप्रकारे ब्रिटिशांनी गौरव होण्याची ही इतिहासातली पहिली आणि एकमेव घटना असल्याचं संरक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

आयएनएस शिवाजीला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेमध्ये भारतीय नौदल तटरक्षक दल आणि सुमारे 20 देशांच्या नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यामध्ये आण्विक, रासायनिक, जैविक हल्ल्यापासून संरक्षण करणे, मरीन इंजिनिअरिंग, नौदलाच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही जहाजावर काम करण्यापूर्वी आवश्यक असलेले प्रशिक्षण, बेसिक कंप्यूटर एप्लीकेशन, डिझेल आणि गॅसवर चालणाऱ्या टरबाइनच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाबरोबरच आयएनएस शिवाजीने अगदी वाफेवर चालणाऱ्या जहाजांच्या इंजिनपासून ते आधुनिक काळातील सागरी सुरक्षा प्रणालीच्या कार्यान्वनाचे प्रशिक्षण देण्याची क्षमता ही विकसित केली आहे. हे यश भारताच्या सामरिक आणि संरक्षण क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.