पिंपरी-चिंचवड (पुणे) - युक्रेन रशिया युद्ध सुरू असल्याने भारतातील हजारो विद्यार्थी परत मायदेशी येण्यासाठी धरपड करत ( Indian student stuck in Ukraine ) आहेत. अनेकांना भारतात आणण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आदित्य लक्ष्मण काची हा देखील युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तो पहिल्याच वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान, आदित्य यांच्यासह शेकडो विद्यार्थी रोमानियाच्या बॉर्डर पर्यंत चालत ( Indian student at romania border ) आले, शिवाय उणे पाच डिग्री तापमानात तीन दिवस केवळ बिस्किटावर काढले असे कटू अनुभव आदित्यने ( Ukraine War Experience ) सांगितले आहेत.
'15 किलोमिटर अंतर पायी चाललो'
आदित्य काची हा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या वडिलांची चहाची टपरी असून पै- पै जमा करून त्याला उच्च शिक्षित करून डॉक्टर करण्याचं स्वप्न वडील लक्ष्मण काची यांचं होत. त्यानुसार, त्याला युक्रेन येथे MBBS च शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. पण, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळ त्याला भारतात परतावं लागलं आहे. आदित्य ला तो शिक्षण घेत असलेल्या युनिव्हर्सिटीने बस ची सुविधा करून त्यांना रोमानिया बोर्डरवर सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, आदित्यसह शेकडो विद्यार्थ्यांना रोमानियाच्या 15 किलोमीटर अंतरावर सोडलं. विद्यार्थ्यांनी ते अंतर पायी चालत कापले.
उणे पाच डिग्री तापमानात तीन दिवस घालावे -
मात्र, त्यांचा संघर्ष एवढ्यावरच थांबला नाही. रोमानिया बॉर्डरवर हजारोच्या संख्येने विद्यार्थी होते. त्यामुळे उणे पाच डिग्री तापमानात तीन दिवस घालावे लागले. बर्फवृष्टी होत असल्याने त्यांना झोपताही येत नव्हते. अशी अत्यंत वाईट परिस्थिती झाल्याचं आदित्य ने सांगितलं. विद्यार्थ्यांची सहनशीलतेचा अंत झाल्याने काही जण आक्रमक झाले तेव्हा, युक्रेन सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला यामुळं तानावाच वातावरण होत अस देखील आदित्य ने सांगितले आहे. सध्या आदित्य हा भारतात परतला असून केंद्र सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न आम्हाला मायदेशी आणल्याबद्दल त्याने आभार मानले आहेत.
हेही वाचा - Three People Drowned In Pune : पुण्यात तीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू