इंदापूर: मुलाने अमानुषपणे आईला मारहाण केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिलीप जाधव असे अमानुषपणे मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे. आईने आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून इंदापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे राहणार इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील रहिवासी आहेत. आईला त्यांच्या मोठ्या मुलाने राहत्या घरी मारहाण केली तसेच शिवीगाळ, दमदाटी करून डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार: त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. आशा आशयाची तक्रार आईने दिली आहे. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी घडली आहे. 25 तारखेला आईने चक्कर येऊ लागली होती. त्यामुळे त्याच्या धाकट्या मुलाने जाधव यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल Upazila Hospital केले. त्यानंतर त्यांनी आज इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून इंदापूर पोलिसांनी दिलीप यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात आज गुन्हा नोंद केला आहे.
इंदापूर पोलिसांनी आरोपी विरोधात भा.दं.वि. कलम 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मुलाने आईला मारहाण का केली याची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु आईला मिळणारी पेंशन मुलाला पाहिजे होती. त्यामुळे मुलाने आईला मारहाण केल्याची चर्चा आहे. परंतु याबद्दल अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास इंदापूर पोलीस करत आहेत.