पुणे - हंगामात उत्पादनात राज्यातील सर्वात मोठी लागवड असलेल्या आणि उलाढाल करणाऱ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात पोषक हवामानामुळे टोमॅटोची आवक वाढली आहे. यामुळे भाव निम्म्याने घटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून नारायणगाव बाजार समितीत 20 किलोच्या कॅरेटला 250 ते 300 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एप्रिल, मे महिन्यात हे भाव कॅरेटला 300 ते 600 रुपये होते.
सध्या पोषक हवामान असल्याने गळीत वाढले आहे. मे महिन्यात बाजार समितीत रोज 30 ते 40 हजार कॅरेटची आवक होते मात्र, मागील 2 दिवसांपासून ही आवक 60 ते 70 हजार कॅरेट होऊ लागली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.