चाकण (पुणे) - चाकणमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाची सध्याची स्थिती
चाकण नगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4424 वर पोहचली असून आता पर्यंत 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावर 3963 जणांनी मात करत घरवापसी केली असून उर्वरित 416 जण कोरोना उपचार घेत आहेत. MIDC भागात गृहविलगीकरणाच्या नावावर नागरिक फिरत असून गावात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना गृहविलगीकरणात राहण्याचे आवाहन करण्यात येते आहे. मात्र, नागरिक विलगीकरणात न राहता बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याचे चित्र चाकण नगरपालिका क्षेत्रात पहायला मिळत आहे.
नगरपालिका क्षेत्रातील आकडेवारी
दिनांक | बाधित रुग्ण | डिस्चार्ज रुग्ण | मृत्यू | सक्रिय रुग्ण |
06 मे | 96 | 165 | 00 | 432 |
07 मे | 59 | 41 | 00 | 450 |
08 मे | 82 | 55 | 00 | 477 |
09 मे | 46 | 85 | 00 | 437 |
10 मे | 37 | 58 | 00 | 416 |
ही आहेत कोरोना हॉटस्पॉट
लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होत असल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. चाकण परिसरातील विशाल गार्डन, मुटकेवाडी, झित्राई मळा, आगरकरवाडी, रानुबाई मळा, खंडोबा माळ, बालाजी नगर हे भाग कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे.
हेही वाचा -केंद्राकडून कोरोना वॉरियरची मृत्यूनंतरही थट्टा... केवळ 27 टक्के विमा मंजूर