ETV Bharat / state

दमदार पावसामुळे पुण्याच्या धरण साठ्यामध्ये वाढ

पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणामध्ये सुमारे 61 टक्के, पानशेत धरणामध्ये 34 टक्के आणि वरसगाव धरणामध्ये 22 टक्के जलसाठा झाला आहे.

दमदार पावसामुळे पुण्याच्या धरण साठ्यामध्ये वाढ
author img

By

Published : Jul 9, 2019, 5:25 AM IST

पुणे - गेल्या 48 तासांमध्ये संततधार पावसामुळे पुण्याच्या धरण साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात 42 मिलिमीटर, पानशेतमध्ये 85 मिलिमीटर, वरसगावमध्ये 98 मिलिमीटर आणि टेमघर धरणामध्ये 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणामध्ये सुमारे 61 टक्के, पानशेत धरणामध्ये 34 टक्के आणि वरसगाव धरणामध्ये 22 टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा 0.93 टक्क्यांनी अधिक आहे.

दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साठत आहे. त्यामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

Intro:पुणे - गेल्या 48 तासांमध्ये संततधार पावसामुळे पुण्याच्या धरण साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात 42 मिलिमीटर, पानशेतमध्ये 85 मिलिमीटर, वरसगावमध्ये 98 मिलिमीटर आणि टेमघर धरणामध्ये 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Body:पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणामध्ये सुमारे 61 टक्के, पानशेत धरणामध्ये 34 टक्के आणि वरसगाव धरणामध्ये 22 टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा 0.93 टक्क्यांनी अधिक आहे.

दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साठत आहे त्यामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.