पिंपरी (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात दोन श्वानाला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. तसेच इतर श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात एकूण 12 श्वानांचा मृत्यू झाला. यामध्ये पिलांचा देखील समावेश आहे. तसेच, काही कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्राणी प्रेमींनी दिली आहे.
यापुर्वी पिंपळे गुरवमध्ये सृष्टी चौकत श्वानाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून जीवे मारल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पिंपळे गुरव मधील शिवनेरी गल्लीमध्ये दोन श्वानाला पेट्रोल टाकून जाळले. एकूण 12 श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच उघड झाले आहे.
प्राणी प्रेमींनी दिले पोलिसांना निवेदन-
याप्रकरणी प्राणी प्रेमींनी सांगवी पोलिसांना निवेदन दिले असून याचा तपास सुरू आहे. एकूण 12 श्वानांचा विषबाधा होऊन संशयास्पद मृत्यू झाला. तर दोन श्वानाला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. दरम्यान, पोलीस गुन्हा नोंदवून घेत आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
मनुष्याला न शोभणार कृत्य-
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मनुष्याला न शोभणार कृत्य केल्याने अज्ञात व्यक्तिविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. "मुक्या प्राण्यांना त्रास न देता माणुसकीची भावना ठेवावी. अशी क्रूरतेच्या घटना घडत आहेत त्याच्या विरोधात एकजूट करावी", असे आवाहन प्राणी मित्र कुणाल यांनी केलं आहे.
हेही वाचा- राज्यात आज 2 हजार 765 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 29 रुग्णांचा मृत्यू