ETV Bharat / state

मागील पाच दिवसात पुण्यात आगीच्या सात घटना, कोट्यवधींचे नुकसान - पुणे आग

पुण्यात मागील पाच दिवसात आगीच्या सात घटना घडल्या आल्या आहेत. या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मागील पाच दिवसात पुण्यात आगीच्या सात घटना

author img

By

Published : Mar 31, 2021, 5:05 PM IST

पुणे - प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर आधीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. यामध्ये काही आगीच्या घटना किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाच्या असतात. पुण्यात मागील पाच दिवसात आगीच्या सात घटना घडल्या आल्या आहेत. या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले.

भंगार दुकानाला आग
शुक्रवारी (26 मार्च) गंज पेठेतील मासेआळी येथे भंगार मालाच्या एका दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात झोपलेल्या एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले. तर याच दिवशी सायंकाळी खराडीतील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीतील पाच दुकाने आणि पहिल्या मजल्यावर असणारे एक डायग्नोस्टिक लॅब जळून नष्ट खाक झाली होती.

हेही वाचा- पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम बाप गजाआड

फॅशन स्ट्रीटला आग
याच दिवशी (शुक्रवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 500 हून अधिक दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. यामध्ये फॅशन स्ट्रीटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. रात्री अकरा वाजता लागलेली ही आग एक वाजण्याच्या सुमारास विजली. तोपर्यंत या ठिकाणी करोडो रुपयांचे नुकसान झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

पार्किंगमध्ये केमिकल लीक
सोमवारी दुपारी कर्वे रस्त्यावरील पुणे सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल लीक झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य धोका दूर केला.

शिक्षण खात्याच्या इमारतीत आग
याच दिवशी (सोमवारी) दुपारी प्रसिद्ध कुमठेकर रस्त्यावर असलेल्या शिक्षण खात्याच्या (SCERT) इमारतीमधे पावणेदोन वाजता भीषण आग लागली. लाकडी सामानाला लागलेल्या या आगीने पाहता-पाहता रुद्र रूप धारण केले. परंतु या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी धाव घेतल्यामुळे जीवितहानी टळली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा- पंढरपूर पोटनिवडणूक: शैलजा गोडसेंची बंडखोरी, शिवसेनेतून हकालपट्टी

गाड्यांच्या सर्विस सेंटरला भीषण आग
मंगळवारी मध्यरात्री रस्त्यावरील एकाच चारचाकी गाड्यांच्या सर्विस सेंटरला भीषण आग लागली होती. या सर्विस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्ट आणि केमिकल असल्यामुळे आग सर्वत्र पसरली होती. या आगीत सर्विस सेंटरमध्ये असणाऱ्या चार चार चाकी गाड्या जळाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

नऱ्हे -धायरीतील एका कारखान्याला आग
नऱ्हे -धायरीत 10 हजार स्क्वेअर फूट परिसरात असणाऱ्या एका कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत चार कंपन्या नष्ट झाल्या आहेत. यामध्ये वाढदिवसाच्या पार्टी पॉप फटाका बनविण्याची, फर्निचर, इंडस्ट्रियल मटेरियल, स्टील फर्निचर अशा कंपन्या होत्या. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

हेही वाचा- शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.