ETV Bharat / state

Abdul Sattar On Sharad Pawar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले पवार कुटुंबीयांचे कौतुक - Abdul Sattar praised the Pawar family

बारामतीत खडकाळ, मुरमाड जमिनीत केलेले शेतीतील प्रयोग अफलातून आहेत. यातून राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या नाविन्यपूर्ण पद्धती शिकता येतील. बारामतीत पवार कुटुंबियांनी केलेल्या कामामुळे प्रचंड प्रभावित झालो आहे. राजकारण वेगळे, अन्य काम वेगळे. मी येथे राजकीय नेता म्हणून नव्हे तर, कृषिमंत्री म्हणून आलो आहे असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. ते आज बारामतीत बोलत होते.

Abdul Sattar On Sharad Pawar
Abdul Sattar On Sharad Pawar
author img

By

Published : Jan 20, 2023, 5:31 PM IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केले पवार कुटुंबीयांचे कौतुक

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते अप्पासाहेब पवार, राजेंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, हे सर्वच पवार चांगले आहेत. त्यांची पावर अशीच चांगली रहावी हीच ईश्वर, अल्लाह चरणी प्रार्थना करतो अशा शब्दात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पवार कुटुंबियांवर स्तुतीसुमने उधळली. ते बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषिक २०२३ या कृषि प्रदर्शनाच्या उदघाटनाच्या निमित्ताने ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांला देणार न्याय - शेतकरी बॅंकेत कर्जासाठी गेला असता त्याचे सिव्हील तपासले जाते. त्यातून कर्ज मिळण्यास अडचणी येतात. या प्रश्नावर सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांचे जेवढे क्षेत्र आहे, त्यात कोरडवाहू, जिरायत, बागायत हे तपासले पाहिजे. तो कोणती पिके घेणार त्यानुसार कर्ज द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक होवू नये. त्यासाठी केंद्राकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत न्याय दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांला दिवसा वीज मिळावी - कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देते. राज्यात मात्र, शेतकऱ्यांना दिवसाही नीटपणे वीज मिळत नाही. या प्रश्नावर सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेच यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेवू शकतात. कृषिमंत्री या नात्याने शेतकऱ्यांला दिवसा वीज मिळावी, मोफत मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. परंतु शेवटी राज्य चालविण्यासाठी जो काही पैसा लागतो, त्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाच आहे. निश्चित याबद्दल ते दोघे निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना झुकते माप - वीजेला लागणारा खर्च फार मोठा आहे. थकबाकीमुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली तर शेतकऱ्यांला दुःख होते. पण शेतकऱ्यांना सवलत मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही तर विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांकडून घेवू नये, अशी मागणी केंद्राला केली आहे. फक्त एक रुपयाचा अर्ज शेतकऱ्यांने करावे, विम्याची रक्कम केंद्राने भरावी अशी आमची मागणी आहे. येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना निश्चित झुकते माप दिलेले दिसेल असे ते म्हणाले.

नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळायला हवे - राज्यामध्ये कृषि क्षेत्रात खासगी विद्यापीठांना मान्यता दिली जात नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, खासगी विद्यापीठाची संकल्पना अनेक देशांनी स्विकारली आहे. त्यातून कृषि विस्तार अधिक होत आहे. खासगीतील भौतिक सुविधा, अन्य बाबींची सरकारी विद्यापीठाशी तुलना होते. आज शिक्षणाच्या सीमा जगभर विस्तारल्या आहेत. ईस्त्राईलचे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत आणले. सध्या विद्यापीठाच्या माध्यमातून जे नवीन तंत्रज्ञान असेल ते शेतकऱ्यांला मिळावे यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. मला संधी मिळाली तर निश्चित सक्षम संस्थांना अशी मान्यता देण्याबाबत विचार केला जाईल.

मंत्रीमंडळात महिलांना संधी नाही, मंत्रालयात मंत्री भेटत नाहीत, या आरोपावर ते म्हणाले, आरोप करणारांचे ते कामच आहे. मी बारामतीत आलो आहे. आज कोणी माझ्या कार्यालयात गेले तर, तेथे मी भेटणार नाही. त्यामुळे लोकांची अशी भावना होते. मंत्र्यांवर जबाबदाऱ्यां असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यानंतर विभागाचे काम. स्वतःच्या मतदारसंघाची जबाबदारी असते. त्यामुळे साधारणपणे आठवड्यातील तीन दिवस आम्ही मंत्रालयात असतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल असेही सत्तार म्हणाले.

हेही वाचा - CM Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराज जयंती शासकीय कार्यालयात होणार साजरी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.