ETV Bharat / state

पाटेठाणमधून अवैध दारूसाठा जप्त, एकाला घेतले ताब्यात

चारचाकीमधून अवैध पद्धतीने देशी, विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला दौंड तालुक्यातील पाटेठाणमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कारसह 2 लाख 25 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पाटेठाणमधून अवैध दारूसाठा जप्त
पाटेठाणमधून अवैध दारूसाठा जप्त
author img

By

Published : Jan 5, 2021, 4:22 PM IST

दौंड - चारचाकीमधून अवैध पद्धतीने देशी, विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला दौंड तालुक्यातील पाटेठाणमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कारसह 2 लाख 25 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

आरोपीकडून 2 लाख 25 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. अवैध धंद्यांवर पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. पोलिसांना अवैध दारू वाहतुकीची माहिती मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे पोलिसांनी पाटेठाण परिसरात सापळा रचून एकाला चारचाकीसह ताब्यात घेतले. सुरज निवास किरो वय 34 वर्ष रा. पाठेटाण असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या चारचाकीची झडती घेतली असता, त्यामध्ये मोेठ्या प्रमाणात मद्यसाठा अढळून आला. पोलिसांनी चारचाकीसह आरोपीकडून २ लाख २५ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चारचाकीच्या सीटखाली लपवला मद्यसाठा

आरोपीला यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, हा दारूसाठा नेमका कुठे विक्रीसाठी नेण्यात येणार होता, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान दारू वाहतुकीचा कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने वाहानाच्या सीटखाली दारूचे बॉक्स लपवून ठेवले होते. व त्यावर भाजीपाला ठेवण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.